वन अधिकारी : अटकपूर्व जामीन फेटाळला -- जोड

By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30

उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

Forest Officer: Rejected anticipatory bail - Joint | वन अधिकारी : अटकपूर्व जामीन फेटाळला -- जोड

वन अधिकारी : अटकपूर्व जामीन फेटाळला -- जोड

्च न्यायालयाकडून गंभीर दखल

पाचगावातील वनजमिनीवर मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमण आणि उत्खननाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन ६ मे २०१५ रोजी पारित केलेल्या आदेशात मागील १० वर्षांत या क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध दखलपात्र गुन्हे नोंदवा, असे नमूद केले होते. या आदेशावरून प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांनी वर्धेचे उपवनसंरक्षक मुकेश गणात्रा यांच्या अध्यक्षस्थानी चार सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने केलेल्या चौकशीत सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न होताच त्यांच्याविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी या चार जणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अजय माहुरकर, तर आरोपींच्या वतीने ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक डी. एन. गंधेवार हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.

Web Title: Forest Officer: Rejected anticipatory bail - Joint