वन विभागाचे दस्तावेज नक्षल्यांनी जाळले
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:54+5:302015-08-20T22:09:54+5:30
गडचिरोलीतील घटना : वनाधिकार्याच्या निवासस्थानाची मोडतोड

वन विभागाचे दस्तावेज नक्षल्यांनी जाळले
ग चिरोलीतील घटना : वनाधिकार्याच्या निवासस्थानाची मोडतोडएटापल्ली (गडचिरोली) : तालुका मुख्यालयापासून ३४ किमी अंतरावर असलेल्या गा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील सामान व दस्तावेज मंगळवारी रात्री नक्षल्यांनी जाळून टाकले. तसेच कार्यालय प्रमुखाच्या निवासस्थानाची देखील तोडफोड केली. सुमारे २०० च्या संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांनी प्रथम वनपरिक्षेत्राधिकारी मून यांचे घर गाठले. यावेळी मून कार्यालयीन कामाकरिता बाहेर गेले होते. त्यामुळे नक्षल्यांनी शेजारीच राहणार्या दोन वनरक्षकांना झोपेतून उठवून मून यांचे घर उघडण्यास सांगितले. त्यानंतर घरातील दस्तावेज व काही साहित्य बाहेर काढून घराची तोडफोड केली. वनपरिक्षेत्र कार्यालयातील साहित्य, दस्तावेज, पुस्तके बाहेर आणून त्याला आग लावली. यामध्ये नागरिकांच्या वनहक्क दाव्यासंदर्भातील फाईल्स, वनसंरक्षण समितीचे दस्तावेज, पाच कपाटे, एक इन्व्हर्टर, दोन संगणक, दोन शेतजमीन मोजणी यंत्रे, सहा टेबल, दोन व्हील चेअर, ४२ खुर्चा, दोन अग्निनियंत्रक संच, एक सॅटेलाईट फोन संच असे साहित्य जळून खाक झाले. वनहक्क दावे, वनसरंक्षण समितीचे रेकॉर्ड, कार्यालयीन अधिकार्यांचे रेकार्ड जळून खाक झाल्याने भविष्यात अडचण जाणवणार आहे. (प्रतिनिधी)----हे कार्यालय यापूर्वी २००३ साली जाळण्यात आले होते. त्यावेळी मुख्यालयी राहू नये, असा दम वनकर्मचार्यांना भरण्यात आला होता. मात्र कर्मचार्यांनी त्याचे पालन न केल्याने पुन्हा जाळपोळ केली असल्याचे नक्षल पत्रकात म्हटले आहे. या जाळपोळीची दखल घेतली नाही तर, आणखी विध्वंस करण्यात येईल, असेही म्हटले आहे.