विदेशी भाविक ना आले विमान!

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:12+5:302015-09-01T21:38:12+5:30

नाशिक : बारा वर्षांनी होणार्‍या कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये विदेशी पर्यटक येणार असल्याचाी चर्चा सुरू झाली त्यातच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळही खुले झाले, परंतु पहिल्या पर्वणीला काही मोजकेच हौशी पर्यटक वगळता विदेशी पाहुणे आलेच नाही. इतकेच नव्हे तर ओझर विमानतळही सामसूमच होते. त्यामुळे आता विदेशी पाहुणे आणि देशभरातील आणखी पर्यटक यावे यासाठी पर्यटन व्यावसायिकांची बैठक बोलविण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.

Foreign pilgrims did not come! | विदेशी भाविक ना आले विमान!

विदेशी भाविक ना आले विमान!

शिक : बारा वर्षांनी होणार्‍या कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये विदेशी पर्यटक येणार असल्याचाी चर्चा सुरू झाली त्यातच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळही खुले झाले, परंतु पहिल्या पर्वणीला काही मोजकेच हौशी पर्यटक वगळता विदेशी पाहुणे आलेच नाही. इतकेच नव्हे तर ओझर विमानतळही सामसूमच होते. त्यामुळे आता विदेशी पाहुणे आणि देशभरातील आणखी पर्यटक यावे यासाठी पर्यटन व्यावसायिकांची बैठक बोलविण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.
कुंभमेळा हा हिंदूंचा जागतिक सोहळा असल्याने त्यासाठी देश-विदेशातून भाविक येणार अशी शासनाला अपेक्षा होती. अनेक टूर कंपन्यांकडे विदेशी नागरिकांकडून विचारणा होत होती. तसेच देशभरातील टुरिस्ट कंपन्या नाशिकमधील व्यावसायिकांशी संपर्क साधून होत्या. ओझर येथील विमानतळ हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. विदेशी भाविक दिल्ली किंवा मुंबईतून थेट ओझर विमानतळावर उतरतील असे सांगण्यात येत होते; परंतु नाशिकमध्ये पर्वणीच्या दिवशी गर्दी होईल, त्यामुळे विदेशी भाविकांची वेगळी व्यवस्था करता येणार नाही, असे शासकीय यंत्रणेतर्फे सांगितले जात होते. ही नकारात्मकता पर्यटन व्यवसायाला घातक ठरली. नाशिकमध्ये राज्यातील आणि देशातील टुरिस्ट व्यावसायिकांची परिषद झाल्यानंतर नाशिकमध्ये येणार्‍या भाविकांसाठी सुविधा देण्याचे आश्वासन हवेत विरले. त्यामुळे पहिल्या पर्वणीसाठी तरी विदेशी पर्यटकांनी येण्याबाबत तयारी दर्शविली नाही. त्याचा फटका नाशिकच्या टूर व्यावसायिकांनाही बसला. इतकेच नव्हे तर नाशिकच्या जागतिक पातळीवरील ब्रॅँडिंगची संधी जाण्याची शक्यता निर्माण झाली. पोलिसांचे अतिरेकी नियोजन आणि नाशिक शहरात खासगी वाहने आणण्यास केलेली मनाई, त्यामुळे हॉटेलमध्ये राहण्याची सोय न होणे या सर्वबाबींमुळे पहिली पर्वणी फसली आहे. सदरचा प्रकार उघड होताच, आता शासकीय यंत्रणेकडून टूर व्यावसायिकांची पुन्हा बैठक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
..इन्फो...
९१ सालच्या कुंभमेळ्याची आठवण
नाशिकमध्ये यापूर्वी १९९०-९१ मध्ये कुंभमेळा भरला होता. त्यावेळी विदेशी पाहुणे खास बोईंग विमान घेऊन ओझरच्या विमानतळावर अवतीर्ण झाले होते. यंदा नागरी हवाई सेवेची सोय असताना एकही विमान आले नाही. तसेच ओझर विमानतळ येथे राज्य परिवहन महामंडळाच्या पंधरा बस अकारण उभ्याच राहिल्या.

Web Title: Foreign pilgrims did not come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.