विदेशी संस्थांनी भारतात केली 32 हजार कोटींची गुंतवणूक

By Admin | Updated: June 30, 2014 22:44 IST2014-06-30T22:44:08+5:302014-06-30T22:44:08+5:30

नव्या सरकारच्या सुधारणांच्या अजेंडय़ावर मोठा डाव लावताना विदेशी संस्थांनी चालू महिन्यात भारतीय बाजारात तब्बल 32 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Foreign Institutions invest Rs 32,000 crore in India | विदेशी संस्थांनी भारतात केली 32 हजार कोटींची गुंतवणूक

विदेशी संस्थांनी भारतात केली 32 हजार कोटींची गुंतवणूक

>नवी दिल्ली : नव्या सरकारच्या सुधारणांच्या अजेंडय़ावर मोठा डाव लावताना विदेशी संस्थांनी चालू महिन्यात भारतीय बाजारात तब्बल 32 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये विदेशी संस्थांनी शेअर्समध्ये 13,764 कोटी रुपये, तर कर्जरोख्यांत 18,188 कोटी रुपये गुंतविले आहेत. अशा प्रकारे विदेशी संस्थांची भारतातील एकूण गुंतवणूक 31,952 कोटी (5.4 अब्ज डॉलर) राहिली. 
या आकडेवारीमध्ये जून महिन्याच्या शेवटच्या व्यावसायिक सत्रचा म्हणजे सोमवारच्या सत्रचा समावेश नाही. सोमवारी झालेल्या विदेशी गुंतवणुकीचा आकडा त्यात मिळविल्यानंतर जूनमधील एकूण विदेशी गुंतवणुकीचा आकडा आणखी वाढेल.
संपूर्ण जून महिन्यात विदेशी गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे, असे बाजारातील सूत्रंनी सांगितले. तज्ज्ञांच्या मते, केंद्रातील नवे सरकार आर्थिक सुधारणांना गती देईल, अशी धारणा बनलेली आहे. आर्थिक सुधारणांना गती मिळाल्यास अर्थव्यवस्था वाढीच्या मार्गावर प्रवास करील. त्याचा लाभ मिळविण्यासाठी गुंतवणूकदार पुढे येत आहेत. 
शेअर बाजारात विदेशी संस्था या गुंतवणुकीचा मुख्य स्नेत मानल्या जातात. विदेशी संस्थांची गुंतवणूक वाढल्यामुळे जूनमध्ये मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 3.64 अंकांनी वर चढला. सेन्सेक्समध्ये देशातील 30 आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी आली आहे. बाजार 25 हजार अंकांच्या वर पोहोचला आहे. ही बाजारातील सार्वकालिक उंची आहे. मुंबई शेअर बाजाराप्रमाणोच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज सार्वकालिक उंचीवर पोहोचला आहे. हीच गती कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत शेअर बाजार ऐतिहासिक उंची प्राप्त करील, असे या क्षेत्रतील जाणकारांना वाटते. भारतीय जनतेने सुमारे तीन दशकांच्या कालावधीनंतर केंद्रात कुठल्या तरी एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास परतला आहे. त्यातून अभूतपूर्व तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे जाणकारांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: Foreign Institutions invest Rs 32,000 crore in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.