शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
3
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
4
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
5
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
6
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
7
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
8
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
9
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
10
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
11
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
12
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
13
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
14
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
15
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
16
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
17
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
18
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
19
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
20
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव

चिनी कंपन्यांची भारतातील थेट गुंतवणूक वेगाने घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:02 IST

एफडीआय इन्फ्लो फिगर्सने ही माहिती उघड केली. त्यात म्हटले आहे की, भारतात चीनच्या कंपन्यांनी २०१७-२०१८ मध्ये ३५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली.

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लडाखवरून भारत आणि चीन यांच्या संबंधांत मोठा तणाव निर्माण झालेला असला तरी चीनच्या कंपन्यांची भारतातील थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) गेल्या तीन वर्षांत वेगाने खाली येत आहे.

एफडीआय इन्फ्लो फिगर्सने ही माहिती उघड केली. त्यात म्हटले आहे की, भारतात चीनच्या कंपन्यांनी २०१७-२०१८ मध्ये ३५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. फक्त थेट विदेशी गुंतवणूकच कमी होत आहे असे नाही. भारतीय कंपन्यादेखील चीनमध्ये गेल्या तीन ते चार वर्षांत कमीकमीच गुंतवणूक करीत आहेत.

कोणत्याही चिनी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीस परवानगी न देण्याचा सरकारचा विचार आहे का, अशी विचारणा लोकसभेत मंत्र्यांना करण्यात आल्यावर त्यांनी स्पष्टपणे ‘नाही’ असे उत्तर दिले. वाणिज्य, उद्योग व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत दिलेल्या माहितीत म्हटले की, चीनसोबत भारताच्या व्यापारातील तूट ही एप्रिल-जून २०२०-२०२१ मध्ये ५.८ अब्ज डॉलर्स एवढी खाली आली. कारण ही तूट गेल्या वर्षी आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत १३.१ अब्ज डॉलर्सची होती. एवढेच काय दोन देशांतील एकूण व्यापार तूट आर्थिक वर्ष २०२१ च्या एप्रिल-जून या तिमाहीत १६.५५ अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली आली. ही तूट २०१९-२०२० वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २१.४२ अब्ज डॉलर्सची होती.

ही व्यापार तूट कमी करण्यासाठी चीनवर व्यापार प्रतिबंध घातले का? असे विचारल्यावर गोयल म्हणाले की, या क्षणाला सुमारे ५५० उत्पादने ही विदेश व्यापार धोरणाअंतर्गत फक्त चीनच नव्हे, तर सगळ्या देशांकडून आयातीसाठी प्रतिबंधित/निर्बंधित वर्गातील आहेत. त्यामुळे बंदी ही फक्त चीनपुरतीच नाही. अन्य देशांचाही या बंदीत समावेश असून याबाबत अधिक विचारविनिमय सुरू आहे.चीनमधून गुंतवणुकीचा ओघवर्ष २०१७-२०१८ २०१८-२०१९ २०१९-२०२०दशलक्ष डॉलर्स ३५०.२२ २२९.० १६३.७७भारतातून चीनमध्ये झालेली गुंतवणूक (आॅगस्ट २०२० पर्यंतची आकडेवारी)वर्ष २०१७ २०१८ २०१९ २०२०दशलक्ष डॉलर्स ४९.१९ १२.६१ २७.५७ २०.६३

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावFDIपरकीय गुंतवणूक