शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

'गोमातेच्या नावाने मते मागतात, पण...', अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोदी-योगींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 22:10 IST

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी 17 मार्चपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Avimukteshwarananda Saraswati : जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी गौ मातेच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. गायीला माता मानले जात असेल, तर तिला कायदेशीररित्या आईचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. 

गोहत्येच्या मुद्द्यावर फक्त मते मागितली जातातपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ स्वत:ला महान गौप्रेमी असल्याचा दावा करतात, पण गेल्या 11 वर्षातील आकडेवारी वेगळे चित्र दाखवते. गोहत्याबंदीच्या मुद्द्यावर फक्त मते मागितली जातात, पण प्रत्यक्षात ते गायीच्या बाजूने आहेत की नाही, हे स्पष्ट होत नाही. सर्व पक्षांनी ते गोमातेच्या समर्थनात आहेत की विरोधात, हे स्पष्ट करावे. जे विरोधात आहेत, त्यांनीही उघडपणे पुढे यावे. आम्ही त्यांच्या प्रामाणिकपणाचा आदर करू, असेही ते यावेळी म्हणाले.

17 मार्चपासून देशभरात निदर्शनेशंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी गायीबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांना 17 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. ते म्हणाले की, सरकार आणि राजकीय पक्षांनी 17 मार्चपर्यंत गोमाताबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर 17 मार्चपासून आम्ही देशभरात निदर्शने सुरू करू. देशभरातील हे निदर्शन शांततेत होणार असून, ते स्वतः दिल्लीतील रामलीला मैदानात बसणार असल्याचेही सांगितले.

शंकराचार्य पुढे म्हणाले की, 2500 वर्षे जुन्या शंकराचार्य परंपरेत ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखादा शंकराचार्य अशाप्रकारे प्रश्न उपस्थित करून निदर्शने करावी लागतील. हे असे आंदोलन नाही, ज्यामध्ये रस्ते अडवले जातील किंवा जनतेला त्रास दिला जाईल. आमचा उद्देश फक्त सरकार आणि जनतेला जागरूक करणे आहे. सरकारने केवळ निवडणूक आश्वासने न देता, गाईच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथcowगायBJPभाजपाcongressकाँग्रेस