प्रथमच: गोविंद सागर धरणाखालून जाणार रस्ता; हिमाचल सरकार करीत आहे विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 07:40 IST2024-12-17T07:40:11+5:302024-12-17T07:40:34+5:30
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जर्मनीतील तज्ज्ञ व सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे.

प्रथमच: गोविंद सागर धरणाखालून जाणार रस्ता; हिमाचल सरकार करीत आहे विचार
बिलासपूर: गोविंद सागर तलाव या धरणाखाली टनेल तयार करून रस्ता तयार करण्याच्या तयारीत हिमाचल प्रदेश सरकार आहे. हा मार्ग झाला तर धरणाखालून जाणारा हा देशातील पहिला प्रयोग असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जर्मनीतील तज्ज्ञ व सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे.
गोविंद सागर तलाव हिमाचल प्रदेशच्या ऊना आणि बिलासपूर जिल्ह्यात आहे आणि त्याची लांबी सुमारे ५६ किमी आहे, तर रुंदी ३ किमी आहे. या तलावातील टनेलमुळे बिलासपूर शहराला किरतपूर आणि मणाली दरम्यानच्या चार-लेन मार्गाशी जोडले जाईल, असे तंत्रशिक्षण मंत्री राजेश धरमानी यांनी सांगितले.
पर्यावरणाचा विचार
पर्यावरण संतुलनाचा विचार करून या प्रकल्पासाठी अत्याधुनिक आणि शाश्वत जर्मन तंत्रज्ञान वापरले जाईल. त्यासाठी इमर्शन टनल तंत्रज्ञान आणि टनल बोरिंग मशीन वापरले जाईल. टनलचे भाग जमिनीवर तयार केले जातील आणि तलावाच्या खाली स्थापित केले जातील, असे धरमानी यांनी सांगितले.