अन्नसुरक्षा कायदा मार्चपासून अमलात
By Admin | Updated: November 23, 2015 23:45 IST2015-11-23T23:45:32+5:302015-11-23T23:45:32+5:30
तामिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ऐतिहासिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची मार्च २०१६ पासून अंमलबजावणी करणार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी जाहीर केले.

अन्नसुरक्षा कायदा मार्चपासून अमलात
नवी दिल्ली : तामिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ऐतिहासिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची मार्च २०१६ पासून अंमलबजावणी करणार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी जाहीर केले.
आतापर्यंत २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली असून १४ राज्ये त्या प्रक्रियेत आहेत, असे ते म्हणाले. संसदेने २०१३ मध्ये कायदा पारित केला होता. राज्य सरकारांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेरची मुदतवाढ सप्टेंबरमध्ये संपली. केवळ तामिळनाडू वगळता सर्व राज्यांनी मार्च २०१६ पर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी राज्य अन्न सचिवांसोबतच्या आढावा बैठकीनंतर सांगितले.
टमाट्यांची दरवाढ तात्पुरती...
बटाटे, कांदे आणि टमाट्यांचे उत्पादन घटलेले नाही. वाहतुकीसंबंधी समस्या व पावसामुळे टमाट्यांचे दर वाढले आहेत, असे पासवान म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)