चारा घोटाळा; लालूंची याचिका फेटाळली

By Admin | Updated: July 2, 2014 03:26 IST2014-07-02T03:26:06+5:302014-07-02T03:26:06+5:30

कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढण्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेले लालूप्रसाद यादव यांची याच घोटाळ्याशी संबंधित अन्य तीन प्रकरणे फेटाळण्याची मागणी करणारी याचिका सीबीआयच्या न्यायालयाने धुडकावून लावली़

Fodder scam; Lalu's plea rejected | चारा घोटाळा; लालूंची याचिका फेटाळली

चारा घोटाळा; लालूंची याचिका फेटाळली

रांची : चारा घोटाळा अर्थात चाईबासा कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढण्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची याच घोटाळ्याशी संबंधित अन्य तीन प्रकरणे फेटाळण्याची मागणी करणारी याचिका सीबीआयच्या एका न्यायालयाने मंगळवारी धुडकावून लावली़
सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एक़े़रॉय यांनी याप्रकरणी आपला निर्णय सुनावला़ लालूप्रसाद यादव, जदयूचे माजी खासदार जगदीश शर्मा आणि आरक़े़ राणा यांच्या एकसमान याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या.
कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच्या चारा घोटाळ्याच्या एका प्रकरणात सीबीआयच्या दुसऱ्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद व अन्य आरोपींना चाईबासाप्रकरणी गतवर्षी डिसेंबरमध्ये शिक्षा ठोठावली होती़ तूर्तास ते जामिनावर आहेत़ चाईबासाप्रकरणी आपल्याला आधीच शिक्षा सुनावण्यात आली आहे़
तेव्हा या प्रकरणाशी साधर्म्य असलेल्या चारा घोटाळ्याच्या देवघर कोषागार, रांची कोषागार आणि अन्य स्थानांतून अवैध पैसा काढल्याच्या तीन प्रकरणी आपल्याविरुद्ध खटला चालवू नये, अशी मागणी लालूप्रसाद यांनी आपल्या याचिकेत केली होती़
(वृत्तसंस्था)

Web Title: Fodder scam; Lalu's plea rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.