चारा घोटाळा; 23 दोषी, 10 दोषमुक्त

By Admin | Updated: August 24, 2014 02:37 IST2014-08-24T02:37:15+5:302014-08-24T02:37:15+5:30

1981 ते 1990 मध्ये डोरंडा कोषागारातील सात कोटी, सहा लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शनिवारी विशेष सीबीआय न्यायालयाने 1क् जणांना संशयाचा फायदा देऊन मुक्त केले,

Fodder scam; 23 guilty, 10 free from charges | चारा घोटाळा; 23 दोषी, 10 दोषमुक्त

चारा घोटाळा; 23 दोषी, 10 दोषमुक्त

रांची : 1981 ते 1990 मध्ये डोरंडा कोषागारातील सात कोटी, सहा लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शनिवारी विशेष सीबीआय न्यायालयाने 1क् जणांना संशयाचा फायदा देऊन मुक्त केले, तर 23 जणांना दोषी ठरविले आहे.
बी.के. गौतम यांच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चारा घोटाळ्याबाबत आपला निकाल दिला असून त्यात 23 जणांना दोषी घोषित केले आहे. न्यायालयाने या प्रकरणी महसूल विभागाच्या एनुल हक, देवेंद्रप्रसाद, दीनानाथ सहाय व सूरजप्रसाद साहू या चार अधिका:यांना आणि चारा पुरवठादार सुशीलकुमार सिंग, सुनीलकुमार, समीर वालिया, ओ.पी. मिश्र, सुशील खेतान व मदनमोहन पाठक यांना पुराव्याअभावी मुक्त केले. यात अद्यापर्पयतकोणत्याही मोठय़ा राजकीय व्यक्तीला आरोपी केलेले नाही. न्यायालयाने दोषींना तीन ते पाच वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली व पाच हजार ते एक लाखांर्पयतचा दंडही ठोठावला आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Fodder scam; 23 guilty, 10 free from charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.