शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

पंतप्रधान मोदींवर अयोध्येत पुष्पवृष्टी; ५१ ठिकाणी स्वागत, २३ संस्कृत विद्यालयांच्या १८९५ विद्यार्थ्यांचे मंत्रोच्चारण अन् शंखध्वनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 08:41 IST

अयोध्या विमानतळापासून सुरू झालेल्या मोदी यांच्या रोड शोच्या १५ किमीच्या मार्गात त्यांचे हजारो नागरिक, कलाकार, मान्यवरांनी पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. 

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये बांधलेले नवे रेल्वेस्थानक, नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नव्या रेल्वेगाड्यांचे उद्घाटन, तसेच काही विकास प्रकल्पांचे लोकार्पण व काही विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या शहराच्या दौऱ्यावर आले होते. अयोध्या विमानतळापासून सुरू झालेल्या मोदी यांच्या रोड शोच्या १५ किमीच्या मार्गात त्यांचे हजारो नागरिक, कलाकार, मान्यवरांनी पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. 

त्यावेळी लोकांचा उत्साह बघून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाहनाचा दरवाजा उघडला व त्यांनी लोकांना हात उंचावून अभिवादन केले. त्यानंतर वाहनात उभे राहून त्यांनी जनतेला अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोप्रसंगी सुमारे एक लाख लोकांनी ५१ ठिकाणी त्यांचे स्वागत केले. या मार्गात १२ ठिकाणी संत-महंत, तसेच २३ संस्कृत विद्यालयांच्या १८९५ विद्यार्थ्यांनी मंत्र व शंखध्वनीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. 

देधिया, बधावा नृत्ये सादर करून केले जंगी स्वागत- अयोध्या : उत्तर प्रदेशच्या कलाकारांनी केलेले देधिया नृत्य, उत्तराखंडच्या कलाकारांनी चोलिया, लखनऊ येथील नृत्यांगनांनी बधावा लोकनृत्य सादर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत शनिवारी जंगी स्वागत केले.- अयोध्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर तिथून त्यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकापर्यंत रोड शो केला. त्यावेळी  कलाकारांनी विविध नृत्य सादर करून मोदींचे स्वागत केले. त्यात राजस्थानातील कलाकारांनी केलेल्या चक्री नृत्याचाही समावेश होता. 

निमंत्रण अद्याप नाही : मुख्यमंत्री सिद्धरामय्याकोप्पल : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण अद्याप मला मिळालेले नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले. हे निमंत्रण मिळाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेईन, असे ते म्हणाले.

खटल्यातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांनीही केली मोदींवर पुष्पवृष्टी- रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील एक पक्षकार इक्बाल अन्सारी यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या वेळी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. इक्बाल अन्सारी यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी हे अयोध्येत आले आहेत. ते आमचे पाहुणे तसेच देशाचे पंतप्रधान आहेत. 

- अन्सारी यांच्या घराजवळून मोदी यांच्या गाड्यांचा ताफा रवाना झाला, त्यावेळी त्यांनी पुष्पवृष्टी केली. मोदींचे स्वागत करण्यासाठी अन्सारी यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यांचे वडील हाशिम अन्सारी हे रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील जुने पक्षकार होते. २०१६ साली हाशिम यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर इक्बाल यांनी पक्षकार म्हणून न्यायालयात उपस्थित राहण्यास सुरुवात केली.

सोहळ्यासाठी ३०० टन सुवासिक तांदूळ रवाना- रायपूर : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी छत्तीसगडहून ३०० टन सुवासिक तांदूळ शनिवारी पाठविण्यात आला. हा तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी ‘भगवा’ ध्वज दाखविला. - छत्तीसगडच्या परिसरात भगवान राम यांचे आजोळ असल्याचे तसेच १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात ते येथील अनेक ठिकाणी गेले होते असे मानण्यात येते. येथील चंदखुरी हे गाव भगवान राम यांची माता कौसल्या यांचे जन्मस्थान असल्याचेही मानले जाते. 

आगरतळा ते अयोध्या विशेष रेल्वेगाडी सोडावी- आगरतळा : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला असंख्य भाविकांना जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे आगरतळा ते अयोध्या या मार्गावर विशेष रेल्वेगाडी सोडावी, अशी मागणी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली. - साहा यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, सोहळ्यासाठी त्रिपुरातून सुमारे दोन हजार जण अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्यासाठी २० जानेवारीला आगरतळा ते हून अयोध्या व २३ जानेवारीला परतण्यासाठी विशेष गाडी सोडावी. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपा