शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश विधानसभेत आज शक्तिप्रदर्शन,सुप्रीम कोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 07:33 IST

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान व भाजपच्या १० आमदारांच्या याचिकेवरील युक्तिवाद संपल्यावर सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

नवी दिल्ली  - काँग्रेस पक्षाच्या २२ आमदारांच्या राजीनाम्याने अस्थिरता निर्माण झालेल्या मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने शुक्रवारी सायंकाळपर्यंत विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान व भाजपच्या १० आमदारांच्या याचिकेवरील युक्तिवाद संपल्यावर सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. पळवून नेऊन डांबलेल्या आमदारांना मुक्त केल्याखेरीज मतदान घेतले जाऊ नये, यासाठीची काँग्रेसची याचिका फेटाळली गेली.सविस्तर निकालपत्र लगेच देणे शक्य नाही व तोपर्यंत अस्थिरता लांबविली जाऊ शकत नाही, असे नमूद करून न्यायालयाचा आदेशात्मक भाग जाहीर केला. यात म्हटले आहे की, विधानसभेचे अधिवेशन २० मार्च रोजी भरवावे. त्यात विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या सरकारकडे बहुमत आहे का? हाच विषय असेल. या कामकाजाचे शक्यतो थेट प्रक्षेपण करावे.कमलनाथ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद बोलावली आहे. बहुमत सिद्ध करण्याजोगे संख्याबळ नसल्याने या वेळी ते राजीनाम्याची घोषणा करू शकतात, अशी चर्चा आहे.आमदारांना सुरक्षा द्याराजीनामे मंजूर न झालेल्या काँग्रेसच्या २२ आमदारांना आपले हक्क बजावता येतील याची हमी कर्नाटक व मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी घ्यावी. या आमदारांची मतदानासाठी हजर राहण्याची इच्छा असल्यास त्यांना पूर्ण सुरक्षा द्यावी. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस