शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

FloorTest: बहुमत चाचणी म्हणजे काय? जाणून घ्या विधानभवनात कसं करतात बहुमत सिद्ध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 07:38 IST

राजकीय नाट्य कर्नाटकमध्ये सुरू असून नेमकं कर्नाटक कुणाचं? याबद्दलचा गुंता अजूनही सुटलेला नाही.

बंगळुरू- कर्नाटक विधानसभेच्या मतदानाचा निकाल लागल्यानंतर कर्नाटकमध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नाट्य कर्नाटकमध्ये सुरू असून नेमकं कर्नाटक कुणाचं? याबद्दलचा गुंता अजूनही सुटलेला नाही. याचं उत्तर आज मिळणार आहे. येडियुरप्पा यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी आज त्यांच्यासमोर बहुमत चाचणीचं आव्हान आहे. येडियुरप्पा यांना आज बहुमत सिद्ध करावं लागणारं आहे. काँग्रेस व जेडीएसनेही सत्ता स्थानपनेचा दावा केला आहे. त्यामुळे आज चार वाजता कर्नाटकावर नेमकी कुणाची सत्ता येईल? हे समोर येणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आज भाजपा, काँग्रेस व जेडीएस बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. पण ही बहुमत चाचणी नेमकी कशी असते ? व संसदेत कशा प्रकारे सरकार स्थानप होतं? हे जाणून घेऊया.

बहुमत चाचणी म्हणजे काय?कुठल्याही विधानसभेत जेव्हा एका पक्षाला किंवा युतीला निवडणुकीत बहुमत मिळत नाही तेव्हा राज्यपाल नियमानुसार त्या निवडणुकीतील मोठ्या पक्षाला किंवा युतीला ज्यांच्याकडे जास्त आमदारांचं समर्थन आहे अशांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण देतात. पण जेव्हा निमंत्रित पक्षाकडे किंवा युतीकडे बहुमत नसल्याचं लक्षात आल्यावर एका मर्यादेनंतर त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगितलं जातं. बहुमत चाचणीच्या दिवशी सरकारकडून विधानभवनात विश्वासदर्शक ठराव मांडला जातो. त्यावर चर्चा केली जाते. पक्ष व विरोधी पक्षांचे नेते त्यावर मतं मांडतात. 

मतदान करण्याची प्रक्रियाविधानभवनात चर्चेनंतर अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष उपस्थित असलेल्या आमदारांना गुप्त किंवा ध्वनिमताच्या माध्यमातून विश्वासदर्शक ठरावावर मतदान करायला सांगतात. विश्वासदर्शक ठरावाच्या समर्थनार्थ जास्त मत मिळाली, किंवा जास्त आमदारांनी हात वर करून सहमती दर्शविली तर सरकारकडे बहुमत असल्याचं सिद्ध होतं. पण जर विरोधात मत पडली तर सरकारकडे बहुमत नसल्याचं मानलं जातं. 

दरम्यान, कर्नाटक विधानसभेवर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 112 आहे. भाजपाकडे 104 आमदारांचं संख्याबळ आहे. जर येडियुरप्पा यांनी 112 आमदारांचं समर्थन विधानभवनात दाखवलं तर येडियुरप्पाच कर्नाटकचे मुख्यमंत्री राहतील. जर तसं झालं नाही तर येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा लागेल. दुसरीकडे, काँग्रेसचे 78 आमदार निवडून आले आहेत तर जेडीएसचे 38 आमदार आहेत त्यामुळे काँग्रेस व जेडीएसने एकत्रितपणे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. कर्नाटक नेमकं कुणाचं? हे आज चार वाजता स्पष्ट होणार आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८