शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

16 मार्चला ठरणार कमलनाथ सरकारचे भवितव्य, राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 04:26 IST

राज्याचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

भोपाळ  - आमदारांनी बंडखोरी करून राजीनामे दिल्याने मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, राज्याचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी 16 मार्च रोजी कमलनाथ यांच्या सरकारचे भवितव्य निश्चित होणार आहे. दरम्यान, 16 मार्चपासूनच मध्य प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश काँग्रेसने आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा सोडचिठ्ठी दिल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून, शिंदेंचे समर्थक असलेल्या अनेक मंत्री आणि आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. तर भाजपाकडे पुन्हा एकदा मध्य प्रदेशची सत्ता हस्तगत करण्याची संधी चालून आली आहे. 

१६ मार्चपासून सुरू होणार असलेल्या मध्यप्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राज्य काँग्रेसने आपल्या आमदारांसाठी शनिवारी व्हीप जारी केला. विधानसभेत रोज उपस्थित राहून मतदान घेण्याची स्थिती उद्भवल्यास सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश आमदारांना देण्यात आला आहे.मध्यप्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी ही माहिती दिली. सलुजा यांनी सांगितले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद तथा सांसदीय कार्यमंत्री डॉ. गोविंदसिंग यांनी आमदारांसाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, यासाठी हा व्हीप जारी करण्यात आला आहे.

ज्योतिरादित्य समर्थक माजी मंत्र्यांचे राजीनामे मंजूूरभोपाळ : काँग्रेस सोडून भाजपत गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असलेल्या ६ माजी मंत्र्यांनी दिलेले त्यांच्या आमदारकीचे राजीनामे मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी मंजूर केले आहेत. तुलसी सिलावट, इमरती देवी, गोविंदसिंग राजपूत, प्रभूराम चौधरी, प्रद्युम्नसिंग तोमर आणि महेंद्रसिंग सिसोदिया यांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण