पालिकेचा पूरनियंत्रण कक्ष 1 जून पासून सुरू होणार

By Admin | Updated: May 14, 2014 02:36 IST2014-05-13T20:18:34+5:302014-05-14T02:36:54+5:30

शहरात पावासाळ्याच्या कालावधीमध्ये निर्माण होणाया आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पूर रनियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

The flood protection cell of the Municipal Corporation will start from June 1 | पालिकेचा पूरनियंत्रण कक्ष 1 जून पासून सुरू होणार

पालिकेचा पूरनियंत्रण कक्ष 1 जून पासून सुरू होणार

पुणे : शहरात पावासाळ्याच्या कालावधीमध्ये निर्माण होणाया आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पूर रनियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. एक जूनपासून हा कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठीची सर्व संपर्क यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुणे यांनी दिली, या शिवाय नदीकाठच्या परिसरातील क्षेत्रीय कार्यालयांमध्येही दरवर्षी प्रमाणे असे कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळयात या कक्षाची स्थापना करण्यात येते. या ठिकाणी एखादी दूर्घटना घडल्यास अथवा आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास दूरध्वनीसह एसएमएस, ई-मेल आणि फॅक्सद्वारेही या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याची व्यवस्था नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेच्या आढावा बैठकीत पूरनियंत्रण कक्ष आणि आत्पकालीन विभागातर्फे राबविण्यात येणा-्या विविध उपाययोजनांचा मागोवा घेण्यात आला. तसेच, सर्व क्षेत्रीय कार्यालयांना त्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नागरिकांच्या सोयीसाठी २५५०६८००/१/२/३/४ असे पाच दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आल्याचे सोनुने यांनी सांगितले.
================================

Web Title: The flood protection cell of the Municipal Corporation will start from June 1