पम्पोरमधील दशतवाद्यांबरोबरची चकमक संपली. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
By Admin | Updated: February 22, 2016 19:36 IST2016-02-22T19:35:33+5:302016-02-22T19:36:17+5:30
पम्पोर भागामधील एका इमारतीमध्ये घुसलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करास यश आले आहे. दहशतवादी व लष्करातील ही धुमश्चक्री सुमारे ४८ तास सुरु होती.

पम्पोरमधील दशतवाद्यांबरोबरची चकमक संपली. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २२ - श्रीनगर जम्मु राष्ट्रीय महामार्गावरील पम्पोर भागामधील एका इमारतीमध्ये घुसलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करास यश आले आहे. दहशतवादी व लष्करातील ही धुमश्चक्री सुमारे ४८ तास सुरु होती. घटनास्थळी शस्त्रास्त्रे व प्रचंड प्रमाणात दारुगोळा आढळल्याचे या मोहिमेशी संबंधित असलेले अधिकारी मेजर जनरल अरविंद दत्ता यांनी सांगितले आहे.
इमारतीत घुसलेले दहशतवादी हे परकीय दहशतवादी होते. दहशतवादी घुसले त्यावेळी या इमारतीमध्ये अनेक नागरिक अडकले होते. तेव्हा या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे हे आमचे मुख्य ध्येय होते. या पार्श्वभूमीवर राबविलेल्या मोहिमेमध्ये बुलेटप्रुफ गाड्या वापरुन या इमारतीमधून १२० नागरिकांची सुटका करण्यात आली. या इमारतीस अनेक खोल्या असल्याने या मोहिमेस अधिक काळ लागला, असे दत्ता यांनी सांगितले. त्याचबरोबर या मोहिमेमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांचे दत्ता यांनी पुण्यस्मरण केले.
या हल्ल्यामध्ये लष्करे तैयबा ही दहशतवादी संघटना सहभागी असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराचे कॅप्टन दर्जाचे दोन अधिकारी पवन कुमार व तुषार महाजन तसेच लान्स नायक ओम प्रकाश हे हुतात्मा झाले.
Three militants killed, arms and ammunitions recovered - Maj Gen Arvind Dutta (GOC, Victor Force) pic.twitter.com/5vwLJy6ZFf
— ANI (@ANI_news) February 22, 2016