ब्राकुमारी संस्थेतर्फे ध्वजारोहण, व्यसनमुक्ती प्रदर्शन उद्घाटन
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
नाशिक : ब्राकुमारी संस्थेतर्फे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शिवध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवमशास्त्री हनुमानदास महाराज, अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासचे महंत जानकीदास महाराज, मुख्य शाखा प्रमुख ब्राकुमारी वासंती दीदी, ब्राकुमार करुणाभाई, ब्राकुमारी पुष्पा दीदी आदि उपस्थित होते.
ब्राकुमारी संस्थेतर्फे ध्वजारोहण, व्यसनमुक्ती प्रदर्शन उद्घाटन
नाशिक : ब्राकुमारी संस्थेतर्फे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शिवध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवमशास्त्री हनुमानदास महाराज, अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासचे महंत जानकीदास महाराज, मुख्य शाखा प्रमुख ब्राकुमारी वासंती दीदी, ब्राकुमार करुणाभाई, ब्राकुमारी पुष्पा दीदी आदि उपस्थित होते. साधुग्राममधील नांदुरनाका येथील मिरची हॉटेलजवळील सेक्टर-२ डी प्लॉट नंबर ५४६ व ५४७ येथे ब्राकुमारी संस्थेतर्फे राजयोग आत्मशांती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच व्यसनमुक्ती निवारण या विषयावर प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात व्यसनांची कारणे, शरीरावर व मनावर होणारे परिणाम, नुकसान कसे टाळावे या विषयावर माहिती देण्यात येत आहे. त्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ८.३0 या वेळेत पॉझिटिव्ह थिकिंग, सेल्फ मॅनेजमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तसेच आध्यात्मिक विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी ब्राकुमारी पुष्पा दीदी, डॉ. सचिन परब, ब्राकुमारी विणा दीदी, गोदावरी दीदी, पुष्पा दीदी आदि उपस्थित होते.बॉक्समेडिटेशनच्या माध्यमातून व्यसन यज्ञकुंडात स्वाहाब्राकुमारी संस्थेच्या वतीने आयोजित व्यसनमुक्ती प्रदर्शनात मुंबईचे डॉ. सचिन परब आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांचा चमू विविध व्यसनांच्या आहारी गेलेल्या लोकांचे काउन्सलिंग करणार आहे. त्याचबरोबर मोफत होमिओपॅथिक औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या प्रदर्शनात व्यसनमुक्ती प्रदर्शन प्रतिकृती व चित्रांचे सादरीकरण या माध्यमातून व्यसनांना यज्ञकुंडात स्वाहा कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात येईल, असे ब्राकुमारी वासंती दीदी यांनी सांगितले.फोटो ओळीब्राकुमारी संस्थेच्या ध्वजारोहण व व्यसनमुक्ती प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी करुणाभाई, वासंती दीदी, विणा दीदी, डॉ. सचिन परब, पूनम दीदी, मनीषा दीदी, पुष्पा दीदी आदि.