बापरे! ५ वर्षांच्या मुलानं चॉकलेट समजून खाल्ल्या सेक्स पॉवर वाढवणाऱ्या ४ गोळ्या; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 23:42 IST2022-02-24T23:39:38+5:302022-02-24T23:42:00+5:30
सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्या खाल्ल्यानं मुलाची प्रकृती बिघडली; डॉक्टरांनाही सापडेना उपाय

बापरे! ५ वर्षांच्या मुलानं चॉकलेट समजून खाल्ल्या सेक्स पॉवर वाढवणाऱ्या ४ गोळ्या; अन् मग...
पाटणा: बिहारच्या खगडिया जिल्ह्यात आज एक विचित्र घटना घडली. पाच वर्षीय मुलाचे आई वडील मुलाला घेऊन रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी त्यांना समस्या विचारली. आई वडिलांनी सांगितलेला घटनाक्रम ऐकून डॉक्टरांना धक्काच बसला. कारण ५ वर्षांच्या मुलानं चॉकलेट समजून सेक्स पॉवर वाढवणाऱ्या औषधाच्या ४ गोळ्या खाल्ल्या होत्या.
मुलाचे कुटुंबीय त्याला तातडीनं खगाडियातील रुग्णालयात पोहोचले. त्यांनी एमर्जन्सी विभागातील डॉ. बरकत अली यांना झाला प्रकार सांगितला. पाच वर्षांच्या मुलानं चॉकलेट समजून सेक्स पॉवर वाढवणारं औषध खाल्लं. यानंतर मुलगा त्रस्त झाला, त्याला घाम सुटला आणि गुप्तांगात समस्या जाणवू लागली. मुलाची प्रकृती बिघडू लागल्यानं कुटुंबीयांनी त्याला घेऊन रुग्णालय गाठलं.
मुलाची अवस्था पाहून डॉक्टर चिंतेत पडले. यावेळी डॉ. बरकत अली यांना त्यांच्या मित्राची आठवण आली. त्यांनी पाटणा एम्समधील बालरोगतज्ज्ञांशी संवाद साधला. तिथले डॉक्टरदेखील घडलेला प्रकार ऐकून हादरले. आतापर्यंत अशा प्रकारचा एकही रुग्ण त्यांच्याकडे आला नसल्यानं त्यांना उपचारांची कल्पना नव्हती. याबद्दलचं कोणतंही संशोधन, औषध उपलब्ध नसल्यानं एम्सच्या डॉक्टरांना कोणतीच ठोस मदत करता आली नाही.
अखेर देशी उपाय कामी
यानंतर डॉक्टरांनी देशी उपाय वापरण्याचा निर्णय घेतला. एम्सच्या डॉक्टरांनी बरकत अली यांना एक देशी पर्याय सुचवला. लहान मुलाला उलटी करण्यास सांगा. त्यामुळे त्याच्या पोटातील औषधाचा अधिकाधिक अंश बाहेर येईल, असा सल्ला एम्समधील डॉक्टरांनी दिला. त्यानंतर मुलाला मीठ पाणी देण्यात आलं. मीठ टाकण्यात आलेल्या पाणी प्यायल्यानं मुलाला खूप उलट्या झाल्या. यानंतर तासाभरानं मुलाला बरं वाटू लागलं. त्याच्या गुप्तांगातील वेदना कमी झाल्या. यानंतरही डॉक्टरांनी मुलाला देखरेखीखाली ठेवलं.