नळपाणीपुरवठा योजना दुरूस्तीची पाच कामे मंजूर

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:05+5:302015-06-12T17:38:05+5:30

Five works approved for the maintenance of taps | नळपाणीपुरवठा योजना दुरूस्तीची पाच कामे मंजूर

नळपाणीपुरवठा योजना दुरूस्तीची पाच कामे मंजूर

>बारामती : ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम उपविभागाच्या वतीने टंचाई आराखड्याअंतर्गत नळपाणीपुरवठ्याच्या ८४ लाख ९२ हजार रूपयांच्या दुरूस्तीची कामे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर करण्यात आली. यातील ६१ लाख ४४ हजारांच्या ५ कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
पंचायत समितीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाकाळे येथील अंदाजे १३ लाख ८३ हजार रूपयांचे नळपाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतींना कामे सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत. मुर्टी येथील ८ लाख ६४ हजार किंमतीचे काम ई -निविदा स्तरावर आहे. दंडवाडी येथील १० लाख २६ हजार रूपयांच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे. मोढवे येथील १४ लाख ९० हजार रूपयांच्या काम सुरू क रण्याबाबत ग्रामपंचायतीला आदेश देण्यात आले आहे. मेखळी सोनगाव प्रादेशिक योजनेंतर्गत १३ लाख ७९ लाखाचे काम मंजूर करण्यात आले आहे. जैनकवाडी येथील ९ लाख ६८ हजार रूपयांचे नळपाणीपुरवठा दुरूस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. सावळ येथील नळपाणीपुरवठ्याचे अंदाजपत्रक १३ लाख ७९ हजारांचे आहे.
-------------------

Web Title: Five works approved for the maintenance of taps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.