सहाय्यक आयुक्तांनाही पाच हजार दंड
By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:32+5:302015-07-18T01:12:32+5:30
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक साबळे यांनाही राज्य माहिती आयुक्तांच्या औरंगाबाद खंडपीठाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चितळे रस्त्यावर गाळेधारकांनी केेलेल्या अतिक्रमणाबद्दल अजय लयचेी यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली होती. साबळे यांनी माहिती देण्याची जबाबदारी ही अतिक्रमण विरोधी विभागावर ढकलली. लयचेी यांनी प्रथम अपील व राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाकडे अपील दाखल केले. त्यात खंडपीठाने साबळे व इथापे यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम दोघांच्या वेतनातून दोन हप्त्यांत वसूल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. इथापे यांना शेख व लयचेी यांच्या दोन प्रकरणात दोन वेगवेगळे दंड झाले आहेत. महापालिकेच्या कारभारात दोघा अधिकार्यांना दंड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सहाय्यक आयुक्तांनाही पाच हजार दंड
म ापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक साबळे यांनाही राज्य माहिती आयुक्तांच्या औरंगाबाद खंडपीठाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चितळे रस्त्यावर गाळेधारकांनी केेलेल्या अतिक्रमणाबद्दल अजय लयचेट्टी यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली होती. साबळे यांनी माहिती देण्याची जबाबदारी ही अतिक्रमण विरोधी विभागावर ढकलली. लयचेट्टी यांनी प्रथम अपील व राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाकडे अपील दाखल केले. त्यात खंडपीठाने साबळे व इथापे यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम दोघांच्या वेतनातून दोन हप्त्यांत वसूल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. इथापे यांना शेख व लयचेट्टी यांच्या दोन प्रकरणात दोन वेगवेगळे दंड झाले आहेत. महापालिकेच्या कारभारात दोघा अधिकार्यांना दंड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.