‘इसिस’मध्ये गेलेले पाच मल्याळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 02:46 IST2017-10-29T02:45:56+5:302017-10-29T02:46:04+5:30

‘इस्लामिक स्टेट’मध्ये (इसिस) सामील झालेले केरळच्या कन्नुर जिह्यातील पाच तरुण त्या दहशतवादी संघटनेसाठी सीरियामध्ये लढताना ठार झाल्याचे जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आले.

Five Malaysians went to 'Isis' killed | ‘इसिस’मध्ये गेलेले पाच मल्याळी ठार

‘इसिस’मध्ये गेलेले पाच मल्याळी ठार

कन्नुर : ‘इस्लामिक स्टेट’मध्ये (इसिस) सामील झालेले केरळच्या कन्नुर जिह्यातील पाच तरुण त्या दहशतवादी संघटनेसाठी सीरियामध्ये लढताना ठार झाल्याचे जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आले.
‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून गेल्या काही दिवसांत ज्यांना अटक करण्यात आली, त्यांच्या जाबजबाबांतून या पाच जणांच्या मृत्यूस दुजोरा मिळाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
त्यांची नावेही पोलिसांनी
दिली असून, ती पुढीलप्रमाणे
आहेत. शाहनाद (२५ वर्षे), रिशाल (३०), टी.व्ही. शमीर (४५), त्यांचा मुलगा सलमान (२०) आणि शाजीर (२५).
केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नुर जिल्ह्यातून आतापर्यंत १५ जण ‘इसिस’मध्ये गेले आहेत. त्यापैकी काही जण अद्यापही सीरियामध्ये आहेत.
या सर्वांची माथी
भडकावून ज्याने त्यांना ‘इसिस’मध्ये भरती होण्यास उद्युक्त केले त्या यू. के. हमझा याला दोनच दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत केरळमधून बरेच तरुण इसिसच्या कच्छपी लागून सीरियामध्ये गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलीसही अधिक खबरदारी घेत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Five Malaysians went to 'Isis' killed

टॅग्स :ISISइसिस