प्रजासत्ताक दिनाच्या सहा दिवस आधी पाच आलिशान गाड्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 06:06 IST2019-01-21T06:05:57+5:302019-01-21T06:06:01+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या सहा ते सात दिवस आधी येथील नांगलोई भागातील वर्कशॉपमधून ५ आलिशान गाड्या बेपत्ता झाल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Five luxury trains disappeared six days before the Republic Day | प्रजासत्ताक दिनाच्या सहा दिवस आधी पाच आलिशान गाड्या गायब

प्रजासत्ताक दिनाच्या सहा दिवस आधी पाच आलिशान गाड्या गायब

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या सहा ते सात दिवस आधी येथील नांगलोई भागातील वर्कशॉपमधून ५ आलिशान गाड्या बेपत्ता झाल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. घातपाती कारवाया करण्यासाठी या गाड्या कोणी चोरल्या नाहीत ना, याचाही कसून तपास सुरू आहे. या गाड्या शोधण्यासाठी पाच-सहा पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहेत.

फोर्स गुरखा, व्होल्सवॅगन पोलो, फोर्ड इकोस्पोर्ट, मित्सुबिशी पजेरो, होंडा अमेझ या गाड्या बेपत्ता झाल्या. यासंदर्भात वर्कशॉपच्या मालकाने सांगितले की, या प्रकाराची माहिती एका कर्मचाऱ्याने बुधवारी दूरध्वनी करून दिली. चोरीला गेलेल्या वाहनांच्या किल्ल्या पजेरोच्या डॅशबोर्डमध्ये ठेवलेल्या होत्या. त्यातील फोर्स गुरखा, व्होल्सवॅगन पोलो या दोन गाड्या वर्कशॉपच्या शेजारी राहणाºया एका व्यक्तीच्या मालकीच्या होत्या.
>दिल्ली पोलिसांकडून कसून शोध सुरू
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाºया सोहळ्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. कोणत्याही घातपाती कारवाया टाळण्यासाठी सुरक्षा दले सतर्क आहेत. अशा वेळेस पाच गाड्या बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. दिल्ली पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

Web Title: Five luxury trains disappeared six days before the Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.