शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पाचही कोविड-१९ चे मृत्यू भोपळमधील वायुगळती दुर्घटनापीडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 06:01 IST

भोपाळ : पीडितांची विशेष काळजी घेण्यासाठी एनजीओंनी दिले होते अधिकाऱ्यांना पत्र

भोपाळ : कोरोना विषाणूची (कोविड-१९) बाधा होऊन भोपाळमध्ये मरण पावलेले पाचही जण हे १९८४ मध्ये मध्यप्रदेशमध्ये घडलेल्या विषारी वायुगळती दुर्घटनेतून वाचलेले होते, असे बुधवारी अधिकाºयाने सांगितले. गॅसगळती दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांना कोविड-१९ ची बाधा सामान्य व्यक्तींच्या तुलनेत फार लवकर होऊ शकते, असे वायुगळती दुर्घटनेतील पीडितांसाठी काम करीत असलेल्या काही संघटनांनी २१ मार्च रोजी संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले होते.\कोविड-१९ ची बाधा झालेल्याच्या संपर्कात आल्यामुळेच हे पाचही जण मरण पावले, असे हा अधिकारी म्हणाला. वायुगळतीपीडितांवर उपचार करण्यासाठी बनविण्यात आलेल्या भोपाळ मेमोरिअल हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे रूपांतर नुकतेच कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करणाºया केंद्रात करण्यात आले. या बदलामुळे वायुगळतीपीडितांना बराच त्रास सहन करावा लागला, असे भोपाळ ग्रुप फॉर इन्फर्मेशन अ‍ॅणञड अ‍ॅक्शन या अशासकीय संस्थेच्या सदस्य रचना धिंगरा यांनी सांगितले.भोपाळमध्ये कोविड-१९ चा पहिला बळी ५५ वर्षांची व्यक्ती ५ एप्रिल रोजी रुग्णालयात अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे मरण पावली, असा आरोप धिंगरा यांनी केला. वायुगळतीच्या पीडित व्यक्तीलादेखील (८०) आवश्यक तेवढी वैद्यकीय सेवा दिली गेली नाही. तिचा मृत्यू ८ एप्रिल रोजी झाला. तिच्या लाळेचे नमुने ११ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह निघाले, असे रचना धिंगरा म्हणाल्या.मृतांत कर्करोग, क्षयरोग, श्वसन विकाराचे होते रुग्णच्वायुगळतीतील ४० वर्षांची पीडित व्यक्ती वर्षभरापासून तोंडाच्या कर्करोगाने आजारी होती. तिचा १२ एप्रिल रोजी मृत्यू झाला आणि तिच्या लाळेचे नमुने कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले, असे त्या म्हणाल्या.च्वायुगळतीची ५२ वर्षांची पीडित व्यक्ती क्षयरोगाने आजारी होती व तिला श्वास घेण्यास होत असलेल्या त्रासावर तातडीने उपचार मिळाले नाहीत. ही व्यक्ती नुकतीच कोविड-१९ ची पॉझिटिव्ह रुग्ण निघाली. हमिदिया हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.च्वायुगळती दुर्घटनेतून वाचलेल्या ज्येष्ठ पत्रकाराचा (७५) ११ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याच्या लाळेच्या चाचणीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला, असे रचना धिंगरा म्हणाल्या.

टॅग्स :bhopal-pcभोपाळDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या