शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बुडत असलेल्या अंशिकाला वाचवताना एकाच कुटुंबातील पाच मुलं बुडाली, समोर आला दुर्घटनेआधीचा शेवटचा ग्रुप फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 10:50 IST

Six Kids drowning In Ganga:उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये मंगळवारी गंगाघाटावर फोटो काढताना सहा मुले बुडाली होती. त्यातील एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे

लखनौ - उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये मंगळवारी गंगाघाटावर फोटो काढताना सहा मुले बुडाली होती. त्यातील एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे. बिल्हौर येथील गंगा घाटावर झालेल्या या दुर्घटनेतील उर्वरित मुलांचा शोध घेण्यासाठी आज सकाळपासूनच जिल्हा प्रशान, एसडीआरएफ आणि पाणबुड्यांच्या पथकांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. मात्र त्यात अद्यापही यश आलेलं नाही.

या दरम्यान, या सहा मुलांचा शेवटचा ग्रुप फोटो समोर आला आहे. दुर्घटना होण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांनी हा फोटो काढल्याचे सांगण्यात येत आहे. या सहा मुलांपैकी एक मुलगी पाण्यात बुडत होती. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात एकापाठोपाठ एक अशी ही पाच मुलेही बुडाली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा एका मुलाचा मृतदेह सापडला होता. तर पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सौरव कटियारच्या काकांच्या दुकानाचं उद्घाटन होतं. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व नातेवाईक आणि त्यांची मुलं आली होती. त्यामध्ये अनुष्का, तनू, मनू, अंशिका, अभय आणि सौरभ यांचा समावेश होता. सर्वजण मंगळवारी गंगेत उभे राहून फोटो काढत होते. तर गौरी बाहेर उभी राहून फोटो काढत होती.

त्याचदरम्यान, अंशिका बुडू लागली, तिला वाचवताना सर्वांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र हे सर्वजण बुडाले. ही मुलं एकमेकांची नातेवाईक होती. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. संध्याकाळी एसडीआरएफची टीम घटनास्थळी आली. तत्पूर्वी केवळ सौरभचाच मृतदेह हाती लागला होता.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार