शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 09:58 IST

सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचवी अटक करण्यात आली असून वसीम असं आरोपीचं नाव आहे. शुक्रवारी रात्री वसीमला अटक करण्यात पोलिसांना यश आले. 

ठळक मुद्देसुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचवी अटक करण्यात आली असून वसीम असं आरोपीचं नाव आहे. सीमने पोलिसांना पाहताच  गोळीबार सुरू केला पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला.शुक्रवारी रात्री वसीमला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

अमेठी - भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर  विजय मिळवला. मात्र या विजयानंतर स्मृती इराणींचे निकटवर्तीय आणि बरौलिया गावचे माजी सरपंच असलेल्या सुरेंद्र सिंह यांची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचवी अटक करण्यात आली असून वसीम असं आरोपीचं नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री वसीमला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तुलही जप्त केले आहे. वसीमने पोलिसांना पाहताच गोळीबार सुरू केला पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस आणि वसीम दोघेही जखमी झाले आहेत. तसेच हल्ल्यामागचा हा मास्टरमाईंड असल्याची माहिती मिळत आहे. 

सुरेंद्र सिंह यांची हत्या झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी तातडीने अमेठीकडे धाव घेतली होती. तसेच त्यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता. सुरेंद्र यांच्या पार्थिवाला खांदा देतानाच स्मृती इराणी यांनी आरोपींना सोडले जाणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढू, असे सांगितले होते. दरम्यान, सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नसीम, धर्मनाथ गुप्ता आणि बी.डी.सी रामचंद्र यांना याआधी अटक केली आहे. तसेच या तिघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील दोन आरोपी वसीम आणि गोलू हे फरार होते. मात्र आता त्यांना अटक करण्यात आली आहे. 

सुरेंद्र सिंह हे घराबाहेर झोपले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणींच्या प्रचारामध्ये सुरेंद्र सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुरेंद्र सिंह यांचा प्रभाव अनेक गावांमध्ये असल्याने त्याचा स्मृती इराणी यांना फायदा झाला होता. 

 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाamethi-pcअमेठीPoliceपोलिसArrestअटक