फिट्सचा ताण सुस? (सीएनएक्ससाठी..)

By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:31+5:302015-04-15T00:03:31+5:30

सोलापूर : बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वे स्थानकावर तुम्ही असाल अन् अचानक एक जण खाली कोसळतो, पाय वेडेवाकडे करून झटके देतो. अशावेळी तुम्ही काय कराल. अनुभवी लोक धावपळ करतात, कुणी कांदा आणतो तर कुणी पायातील बूट, पायमोजा काढून त्याच्या नाकाजवळ धरतो. हे सगळे होईपर्यंत गर्दीतील प्रत्येकात एकप्रकाराचे टेन्शन निर्माण होते. अशा फिट्सच्या पेशंटना दिलासा देणारे संशोधन सोलापूरच्या डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी करताहेत.

Fits Stress Is Equal? (For CNX ..) | फिट्सचा ताण सुस? (सीएनएक्ससाठी..)

फिट्सचा ताण सुस? (सीएनएक्ससाठी..)

लापूर : बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वे स्थानकावर तुम्ही असाल अन् अचानक एक जण खाली कोसळतो, पाय वेडेवाकडे करून झटके देतो. अशावेळी तुम्ही काय कराल. अनुभवी लोक धावपळ करतात, कुणी कांदा आणतो तर कुणी पायातील बूट, पायमोजा काढून त्याच्या नाकाजवळ धरतो. हे सगळे होईपर्यंत गर्दीतील प्रत्येकात एकप्रकाराचे टेन्शन निर्माण होते. अशा फिट्सच्या पेशंटना दिलासा देणारे संशोधन सोलापूरच्या डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी करताहेत.
सिव्हिल हॉस्पिटलच्या औषधशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे हे संशोधन गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. टीमचे प्रमुख डॉ. विठ्ठल धडके यांच्याशी संवाद साधल्यावर संशोधनाची व्याप्ती लक्षात आली. फिट्स हा तसा जुनाच आजार. याचा त्रास असणारे रुग्ण अचानकपणे खाली कोसळतात. झटके आल्यासारखे करून हातपाय झाडतात. तोंडातून फेस येतो, ही प्रमुख लक्षणे आहेत. पेशंट शुद्धीवर आल्यावर त्याच्या तोंडातून रक्त येते. जीभ चावली गेल्याने असे होते. यात घाबरून जाण्यासारखे काही नाही. फिट्स आल्यावर दातखीळ बसल्याने श्वास रोखला गेल्याने हातपाय ताणले जातात. पेशंटला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करावा. कांद्यामध्ये अमोनिया असल्याने पेशंट लवकर शुद्धीवर येतो. त्यामुळे फिट्सवर कांद्यांचा इलाज असे म्हटले जाते.
फिट्सची लक्षणे
ग्रामीण भागात याला झटका, मिरगी किंवा फेफरे या नावाने ओळखले जाते. हातपाय वाकडे होणे, तोंडाला फेस येणे ही प्रमुख लक्षणे आहेत. हा आजार जन्मत: किंवा अपघातात डोक्याला मार लागल्यावर उद्भवतो. स्ट्रोक आल्यानंतर पेशंटला धोका असतो.
आजार कशामुळे
मेंदू, डोक्याचे आजार व मधुमेहाचे झटके यामुळे फिट्स येतात. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यावर असे अचानकपणे घडते. अलीकडे अपघात व मधुमेहामुळे असे पेशंट वाढत आहेत. स्त्री आणि पुरुषात याचे प्रमाण कसे आहे याचा अभ्यास सुरू आहे. अशी लक्षणे असलेल्या पेशंटना आग, पाण्यापासून दूर ठेवणे, वाहन चालविताना काळजी घेणेच हितावह असते.
निदान शक्य
एमआरआय व ईईजी तंत्रामुळे फिट्सचे नेमके कारण काय हे कळणे शक्य झाले आहे. त्यावरून उपचाराच्या अनेक पद्धती व जुनी औषधे उपलब्ध आहेत. मधुमेही पेशंटमध्ये हे प्रमाण कसे खाली आणता येईल, यावर विद्यार्थ्यांचे संशोधन सुरू आहे. यात दिलासा देणार्‍या उपचार पद्धती सुचविण्यात आल्या आहेत.

Web Title: Fits Stress Is Equal? (For CNX ..)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.