शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

तेजस एक्स्प्रेसला पहिल्यांदाच अडीच तास उशीर, क्लेम केल्यास २१३५ प्रवाशांना मिळेल नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 8:29 AM

tejas express : आयआरसीटीसीला  (IRCTC) पहिल्यांदाच २१३५ प्रवाशांना जवळपास साडेचार लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. 

लखनऊ : भारतातील पहिली खासगी ट्रेन तेजस (Tejas Express) शनिवार-रविवारी तीन फेऱ्यांमध्ये एक ते अडीच तास उशिरा पोहोचली. त्यामुळे आयआरसीटीसीला  (IRCTC) पहिल्यांदाच २१३५ प्रवाशांना जवळपास साडेचार लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. 

दरम्यान, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ऑटोमेटिक सिग्नल फेल झाल्याने तेजस एक्स्प्रेस जवळपास अडीच तास उशिरा प्लॅटफॉर्मवर पोहोचली. त्यानंतर परत जाण्यासाठी सुद्धा ट्रेन लखनऊसाठी इतक्याच उशिरा पोहोचली. रविवारी सुद्धा लखनऊ-दिल्ली तेजसला जवळपास १ तास उशीर झाला.

विशेष म्हणजे, उशीर झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई देणारी तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली ट्रेन आहे. नियमानुसार, ट्रेन एक तास उशिर झाल्यास १०० रुपये आणि दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक उशिर झाल्यास २५० रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. 

आयआरसीटीसीला शनिवारी तेजसच्या दोन फेऱ्यांसाठी १५७४ प्रवाशांसाठी प्रति व्यक्ती २५० रुपये यानुसार एकूण ३ लाख ९३ हजार ५०० रुपये द्यावे लागणार आहे. तर रविवारी पहिल्या फेरीच्या ५६१ प्रवाशांना एक तासाच्या उशिरासाठी १००-१०० रुपये याप्रमाणे ५६१०० रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल.

एकूण २१३५ प्रवाशांना ४४९६०० रुपये नुकसान भरपाईआयआरसीटीसीचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अजित सिन्हा म्हणाले की, १५७४ प्रवाशांच्या दाव्यावर (क्लेम) ३ लाख ९३ हजार ५०० रुपये परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. रविवारी लखनऊपासून नवी दिल्ली एक तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यामुळे ५६१ प्रवाशांना प्रत्येकी १०० रुपये मिळतील. अशा प्रकारे एकूण २१३५ प्रवाशांना ४४९६०० रुपये नुकसान भरपाई मिळेल.

दोन वर्षांत पहिल्यांदाच अडीच तास उशीरविमान उड्डाणासारख्या सुविधा असलेल्या तेजस एक्स्प्रेसची सुरुवात ४ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत या ट्रेनबद्दल पाच तक्रारी आल्या आहेत, जेव्हा ट्रेनला एक तासापेक्षा कमी उशीर झाला होता. दोन वर्षांत पहिल्यांदाच ट्रेन एक तासाहून अधिक उशिरा पोहोचली.

टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेसrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसी