पहिल्यांदाच तेजसला झाला उशीर, प्रवाशांना मिळणार भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 08:01 IST2019-10-20T07:59:22+5:302019-10-20T08:01:02+5:30
लखनऊ जंक्शनवर गुरुवारी रात्री कृषक एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्यानं एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचं वेळापत्रक बिघडलं.

पहिल्यांदाच तेजसला झाला उशीर, प्रवाशांना मिळणार भरपाई
लखनऊः लखनऊ जंक्शनवर गुरुवारी रात्री कृषक एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्यानं एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचं वेळापत्रक बिघडलं. त्यामुळे नवी दिल्लीला जाणारी 82501 तेजस एक्स्प्रेसला पावणेतीन तासांचा उशीर झाला. अशातच आयआरसीटीसीनं दिलेल्या आश्वासनानुसार प्रवाशांना भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानं कृषक एक्स्प्रेसला 10 तास उशीर झाला. त्याशिवाय लखनऊ मेल, पुष्पक एक्स्प्रेस, चंदीगड एक्स्प्रेससह अनेक मेल आणि एक्स्प्रेसवर याचा परिणाम झाला.
- देशात पहिल्यांदाच ट्रेनला उशीर झाल्यानं प्रवाशांना मिळणार भरपाई
देशात पहिल्यांदाच कोणत्या तरी ट्रेनला उशीर झाल्यानं प्रवाशांना भरपाई मिळणार आहे. आयआरसीटीसीचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अश्विनी श्रीवास्तव यांनी सांगितलं की, कृषक एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्यानं लखनऊ जंक्शनवरून ट्रेन पावणेतीन तास उशिरानं सुटली. तिला दिल्लीला पोहोचेपर्यंत सव्वातीन तासांचा उशीर झाला. परत येतानाही ही ट्रेन जवळपास दोन तासांहून उशिरानं सुटली. त्यामुळे आयआरसीटीसी आपल्या दाव्यानुसार प्रवाशांना 250-250 रुपयांची भरपाई देणार आहे. आयआरसीटीसीनं यासाठी सर्व प्रवाशांच्या मोबाइल नंबरवर लिंक पाठवली आहे. या लिंकवर प्रवासी भरपाईची मागणी करू शकतात. प्रवाशांनी क्लेम केल्यानंतर विमा कंपनी भरपाई देणार आहे.
- कृषक एक्स्प्रेसच्या प्रवाशांना झाला उशीर
कृषक एक्स्प्रेसच्या प्रवाशांना शुक्रवारी पूर्ण रात्र लखनऊ जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवर काढावी लागली. ही ट्रेन रात्री 11.10 वाजताच्या ऐवजी सकाळी 9.10 वाजता रवाना झाली. यादरम्यान प्रवासी मोठ्या संख्येनं सिटी स्टेशन आणि बादशाहनगर स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होते. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना योग्य माहिती मिळालेली नाही. रेल्वे प्रशासनामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.