शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कोरोना लसींमुळे राजकीय पक्षाला ताप येतो, हे पहिल्यांदाच पाहिले - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 11:05 AM

मोदी म्हणाले की, आतापर्यंत अनेक वाढदिवस आले व गेले, पण त्यापासून नेहमीच अलिप्त राहिलो. पण यंदाचा माझा वाढदिवस खूप वेगळा होता. 

नवी दिल्ली  : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही जणांना ताप येतो असे डॉक्टरांकडून ऐकले होते, पण शुक्रवारी कोरोना लसींचे अडीच कोटी डोस दिल्याचे ऐकून एका राजकीय पक्षालाच ताप आला हे पहिल्यांदाच पाहिले, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता त्या पक्षाला लगावला.शनिवारी सकाळी गोव्यातील आरोग्यसेवकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी एका आरोग्यसेवकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली. मोदी म्हणाले की, आतापर्यंत अनेक वाढदिवस आले व गेले, पण त्यापासून नेहमीच अलिप्त राहिलो. पण यंदाचा माझा वाढदिवस खूप वेगळा होता. 

इतर दिवशीही अडीच कोटी डोस द्या : राहुल गांधीकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते की, देशात इतर दिवशीही अडीच कोटी डोस नागरिकांना मिळायला हवेत. त्या क्षणांची लोक वाट पाहत आहेत. माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणाले की, नागरिकांना मोठ्या संख्येने डोस देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचीच का वाट पाहिली गेली?  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस