पहिल्यांदाच जीएसटी भरणाऱ्या कंपन्यांना दिलासा; मुदत महिन्याने वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 07:30 PM2019-06-21T19:30:59+5:302019-06-21T19:31:53+5:30

वार्षिक कर परतावा भरण्याची शेवटची तारिख 30 जून 2019 आहे.

First time GST firms provide relief; will submit Gst by 31st August | पहिल्यांदाच जीएसटी भरणाऱ्या कंपन्यांना दिलासा; मुदत महिन्याने वाढविली

पहिल्यांदाच जीएसटी भरणाऱ्या कंपन्यांना दिलासा; मुदत महिन्याने वाढविली

googlenewsNext

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या काळातील पहिली जीएसटी काऊन्सिलची बैठक आज पार पडली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पहिल्यांदाच जीएसटी भरणाऱ्या कंपन्यांना दिलासा देण्यात आला आहे.

 
वार्षिक कर परतावा भरण्याची शेवटची तारिख 30 जून 2019 आहे. मात्र, व्यापार आणि व्यवसाय प्रतिनिधींनी मागणी केल्याने ही मुदत वाढविण्यात आली असून पहिल्यांदाच कर भरणाऱ्या कंपन्यांना 30 ऑगस्टपर्यंत जीएसटी भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. 




महसूल सचिव एबी पांडे यांनी ही माहिती दिली. 5 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या डिलरसाठी त्रैमासिक आणि त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेले डीलरना दर महिन्याला जीएसटी भरावा लागणार आहे. तसेच सेवा पुरवठादारांसाठी घेतलेला निर्णय आता कायद्यात रुपांतरीत केल्याचे त्यांनी सांगितले. 


तसेच जीएसटीसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिय सुलभ करण्यात आली असून याआधी लोकांना अनेक कागदपत्रे द्यावी लागत होती. आता केवळ आधार कार्डाद्वारे जीएसटी नोंदणी केली जाणार आहे. हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे पांडे म्हणाले. 




अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले की, कर्नाटक, मिझोराम आणि तेलंगानाचे प्रतिनिधी बैठकीला नव्हते. त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी गुरुवारी सायंकाळी बोलणे झाले आहे. तर अन्य राज्यांचे प्रतिनिधी, मंत्री बैठकीला हजर होते. कर्नाटकसह दोन राज्यांचे नियोजित दौरे असल्याने त्यांचे प्रतिनिधी आले नसल्याचे सितारामन यांनी स्पष्ट केले. 

Web Title: First time GST firms provide relief; will submit Gst by 31st August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.