शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 21:15 IST

अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

नवी दिल्ली - नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतरचे संसदेचे पहिलेच अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. दरम्यान, बिहारमध्ये चमकी आजाराने झालेले लहान मुलांचे मृत्यू आणि जम्मू काश्मीरमध्ये दररोज होत असलेले दहशतवादी हल्ले यावरून पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.  यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज संध्याकाळी बोलावलेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. केंद्रात पुन्हा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला घेरण्यासाठी कोणती रणनीती आखता येईल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत चर्चा करण्यात आली. आता बुधवारी सकाळी पुन्हा एखदा यूपीएची बैठक बोलावली असून, त्यावेळी सर्वपक्षीय बैठकीत जाण्याबाबत निर्णय होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक देश एक निवडणुकीसाठी मोदींकडून विचाराधीन असलेल्या प्रस्तावाला विरोधी पक्षांकडून विरोध होऊ शकतो.  दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचे उमेदवरा ओम बिर्ला यांना समर्थन देण्याबाबत विरोधकांमध्ये एकमत झाले आहे. आज झालेल्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, डीएमके नेत्या कनिमोझी, सीपीआय नेते डी. राजा आणि नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.  

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी