शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम आवाज उठवणारे म्हणाले आता मी शांतपणे मरू शकेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 21:46 IST

तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात या निर्णयाबाबत जे समाधान व्यक्त केले जात आहे. तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम राजकीय आवाज उठवणाऱ्या आरिफ मोहम्मद खान यांनीही तिहेरी तलाकचे स्वागत केले आहे.

बहराइच, दि. 22 - तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात या निर्णयाबाबत जे समाधान व्यक्त केले जात आहे. तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम राजकीय आवाज उठवणाऱ्या आरिफ मोहम्मद खान यांनीही तिहेरी तलाकचे स्वागत केले आहे. आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या खान यांना जेव्हा या निर्णयाची माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी हा मानवता, संविधान आणि इस्लामचा विजय असल्याचे सांगितले. तसेच दीर्घकाळ चाललेल्या लढ्याला न्यायालयात यश मिळाल्याने आता मी शांतपणे मरू शकेन अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात या निर्णयाबाबत जे समाधान व्यक्त केले जात आहे त्याचे सर्वाधिक श्रेय त्या महिलांना जाते ज्यांनी या प्रथेविरोधात न्यायालयात धाव घेतली. तसेच इस्लामच्या नावाने दुकान चालवणाऱ्यांची बाजू न घेता मानवतेची बाजू घेणाऱ्या सध्याच्या सरकारचेही अभिनंदन केले पाहिजे, असे आरिफ मोहम्मद खान म्हणाले. माजी खासदार आणि माजी मंत्री असलेल्या आरिफ मोहम्मद खान यांनी मुस्लिम समाजातील तिहेरी तलाकविरोधात प्रथम राजकीय बंडखोरी केली होती. 1986 साली शाहबाने खटल्यावेळी राजीव गांधी सरकारने कट्टरपंथी मुस्लिमांच्या दबावासमोर झुकून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. आरिफ मोहम्मद खान यांनी या निर्णयाचा विरोध केला होता.  "एक ना एक दिवस महिलांना त्यांचे अधिकार मिळतील असे मी त्यावेळी म्हटले होते. आज तो दिवस आला आहे. आता मी शांतपणे मरू शकतो." आरिफ मोहम्मद खान यांनी शाहबाने खटल्यावेळी राजीव सरकारने केलेल्या घटना दुरुस्तीला विरोध केला होता. तसेच त्याच निषेध म्हणून राजीनामाही दिला होता.  अधिक वाचा पाकिस्तानसह या देशांमध्ये आधीपासूनच 'बॅन' आहे ट्रिपल तलाक, बंदी आणणारा इजिप्त होता जगातला पहिला देशतिहेरी तलाक प्रकरण: शायराबानोच्या खटल्यामुळे शाहबानो खटल्याची आठवण  तिहेरी तलाक : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड भोपाळमधील बैठकीत ठरवणार पुढील रणनीती  दरम्यान, गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल सुनावला. तिहेरी तलाक ही प्रथा बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. तसेच, केंद्र सरकारनं सहा महिन्यांमध्ये तिहेरी तलाकला बंदी घालणारा कायदा बनवावा, असे निर्देश सरन्यायाधीश खेहर यांनी दिले. दरम्यान, कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर 6 महिने बंदी घालण्यात आली आहे.  पाच न्यायाधीशांचे घटनापीठ देणार असलेल्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशभरातील मुस्लिम महिलांचं या निकालाकडे लक्ष लागले होते. निकाल संपूर्णपणे नि:ष्पक्ष असावा आणि कुणालाही तक्रार करण्यास वाव राहू नये या उद्देशाने निकाल सुनावणाऱ्या घटनापीठात पाच प्रमुख  धर्मांच्या न्यायमूर्तींचा समावेश करण्यात आला. सरन्यायाधीश जे.एस. खेहर (शीख), कुरियन जोसेफ (ख्रिश्चन), आर.एफ. नरिमन (पारशी), यू.यू. लळित (हिंदू) आणि अब्दुल नजीर (मुस्लिम) यांचा समावेश आहे.  

टॅग्स :IndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय