शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

काश्मीरमध्ये पहिल्याच बर्फवृष्टीने जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 5:28 AM

काश्मीरमध्ये यंदा हिवाळ्याच्या मोसमातील सर्वात पहिली व जोरदार बर्फवृष्टी शनिवारपासून सुरू झाली. ती रविवारीही कायम होती.

श्रीनगर - काश्मीरमध्ये यंदा हिवाळ्याच्या मोसमातील सर्वात पहिली व जोरदार बर्फवृष्टी शनिवारपासून सुरू झाली. ती रविवारीही कायम होती. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, विमानसेवा व रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. राजौरी जिल्ह्यातील चटयार गावी बकरवाल कुटुंब राहत असलेल्या झोपडीवर शनिवारी रात्री ११.३० वाजता दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत शबिना कौसर ही मुलगी जागीच ठार झाली. तिच्या कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.बर्फवृष्टीमुळे झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर कोसळत असून, त्यामुळे विद्युत पुरवठ्यात अडथळे येत आहेत. राज्याच्या वीज खात्याचे मुख्य अभियंते हश्मत काझी यांनी सांगितले की, नेहमी १,३०० मेगावॅट विजेचा पुरवठा होतो; पण दोन दिवसांत आलेल्या अडचणींमुळे हे प्रमाण ८० मेगावॅटवर आले आहे. २००९ पासून पहिल्यांदाच श्रीनगर शहरात नोव्हेंबर महिन्यात बर्फवृष्टी झाली आहे. तिथे त्याआधी २००४ व २००८ च्या नोव्हेंबर महिन्यात अशी घटना घडली होती.बांदिपोरा जिल्ह्यात हिमस्खलनाच्या घटना घडल्या व पाऊसही पडला. श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी काही उड्डाणे रविवारी रद्द करण्यात आली. श्रीनगर-जम्मूला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही तात्पुरती थांबविण्यात आली असून, त्यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल झाले. रविवार दुपारपासून हा महामार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. जवाहर बोगद्यानजीक ३०० प्रवासी बर्फवृष्टीमुळे अडकून पडले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर