शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणामधून पहिला निकाल आला; भाजपाच्या वादळातही काँग्रेस उमेदवार ४६ हजार मतांनी जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:22 IST

Nuh Election Result : नूह हा राज्याचा मागास जिल्हा आहे. परंतू मतदानाच्या बाबतीत राज्यात पाचव्या क्रमांकाचे मतदान झालेले आहे. या जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत ७२.८१ टक्के सरासरी मतदान झाले होते. 

हरियाणामधून पहिला निकाल हाती आला आहे. सुरुवातीला काँग्रेसच्या बाजुने झुकलेले जनमत अचानक भाजपाच्या बाजुला आले आणि या वादळात पुन्हा एकदा काँग्रेसचे पानिपत झाले आहे. या वादळात पहिला निकाल येत असून काँग्रेसचे नूह मतदारसंघाचे उमेदवार आफताब अहमद हे ४६८७१ मतांनी जिंकले आहेत. 

अहमद यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी असून त्यांनी इनेलोचे उमेदवार ताहिर हुसेन यांचा दारुण पराभव केला आहे. भाजपाच्या उमेदवाराला तिसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार आफताब अहमद यांना एकूण ९१६९७ मते मिळाली आहेत. तर हुसेन यांना ४४८२६ आणि भाजपाच्या संजय सिंह यांना १५८१० मते मिळाली आहेत.

नूह हा राज्याचा मागास जिल्हा आहे. परंतू मतदानाच्या बाबतीत राज्यात पाचव्या क्रमांकाचे मतदान झालेले आहे. या जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत ७२.८१ टक्के सरासरी मतदान झाले होते. 

विनेश फोगाटही आघाडीवर...

दुसरीकडे विनेश फोगाटही ११ व्या फेरीअखेर सहा हजार मतांनी आघाडीवर आहे. विनेश फोगाट या सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर होत्या. परंतू, नंतर त्या पिछाडीवर पडल्या होत्या. आता पुन्हा त्यांनी ६ हजार मतांनी आघाडी घेतली असून त्या मदमोजणी केंद्रावर दाखल झाल्या आहेत. भाजपचे उमेदवार योगेश बैरागी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Haryanaहरयाणाcongressकाँग्रेसBJPभाजपा