शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधी मनीष तिवारी, आता शशी थरुर; प्रियंका गांधींनी दूर केली या दिग्गज नेत्यांची नाराजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:35 IST

काँग्रेस खासदार मनीष तिवारी आणि खासदार शशी थरुर हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

Congress: मनीष तिवारी आणि शशी थरुर हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये गणले जातात. तिवारी हे चंदीगडचे खासदार आहेत, तर थरूर केरळच्या तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.या दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. मात्र, काही काळापासून दोघेही पक्षाच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.

ऑपरेशन सिंदूरवर देशाचे बाजू मांडण्यासाठी परदेशात गेलेल्या खासदारांमध्ये तिवारी आणि थरुर यांचाही समावेश होता. पण, संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची वेळ आली, तेव्हा काँग्रेसने या दोन्ही नेत्यांना बोलण्याची संधी दिली नाही. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. मात्र, अलिकडेच पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दोन्ही नेत्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर प्रियांकांनी दोघांची नाराजी दूर केली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आधी तिवारी, नंतर थरूर यांची भेट

वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी राजकीयदृष्ट्या खूप सक्रिय आहेत. त्या लोकसभेत सरकारवर सातत्याने हल्लाबोल करतात. ऑपरेशन सिंदूरवरील भाषणात तर त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. याशिवाय, त्या पक्षातील नाराज नेत्यांची समजूनत काढताना दिसत आहेत. २९ जुलै रोजी मनीष तिवारी आणि प्रियंका यांच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला होता, तर आता शशी थरुर यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. 

प्रियांका आणि मनीष तिवारी यांची भेट संसदेच्या आवारात झाली. प्रियांका संसदेच्या आत जात असताना, त्या तिवारी यांना भेटताना दिसल्या. दोघांमध्ये काही सेकंदाची चर्चाही झाली. तर, बुधवारी थरुर यांना भेटतानाचा फोटो समोर आला. फोटो पाहता असे दिसते की, दोघांची ही भेट संसद भवनातील आहे. त्यांच्यासोबत इतर काही नेतेही दिसत आहेत. यावरुनच प्रियंका गांधींनी दोन्ही नेत्यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.

तिवारी संसदेत बोलू इच्छित होते!मनीष तिवारी ऑपरेशन सिंदूरवर संसदेत बोलू इच्छित होते. त्यांनी पक्षाला एक पत्रही लिहिले होते, ज्यामध्ये चर्चेत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. काँग्रेसने लोकसभेतील पक्षाचे नेते गौरव गोगोई आणि खासदार कोडिकुनिल सुरेश यांच्यामार्फत थरुर यांच्याशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी नकार दिला आणि त्याऐवजी भारतीय बंदरे विधेयक, २०२५ वर बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल शशी थरुर यांना बोलण्याची संधी न दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. लोकसभेत थरूर यांचे नाव न घेता ते म्हणाले की, आपले शिष्टमंडळ परदेशात भारताची बाजू जोरदारपणे मांडत होते, परंतु काही वरिष्ठ काँग्रेस नेते यामुळे दुखावले आहेत. हेच कारण आहे की, काही काँग्रेस नेत्यांना सभागृहात बोलू दिले गेले नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीShashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधीOperation Sindoorऑपरेशन सिंदूर