अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३० खासदार कोरोना पॉझिटिव्ह, भाजपाचे सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 01:03 AM2020-09-15T01:03:58+5:302020-09-15T06:55:14+5:30

सूत्रांनुसार सर्वात जास्त पॉझिटिव्ह खासदार भाजपचे तर वायएसआर काँग्रेसचे दोन-दोन आणि शिवसेना, द्रमुक, आरएलपीचा प्रत्येकी एकेक सदस्य पॉझिटिव्ह निघाले.

On the first day of the convention, 30 MPs corona positive, BJP's highest | अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३० खासदार कोरोना पॉझिटिव्ह, भाजपाचे सर्वाधिक

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३० खासदार कोरोना पॉझिटिव्ह, भाजपाचे सर्वाधिक

Next

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी राज्यसभा व लोकसभेचे मिळून ३० सदस्य कोरोना विषाणू चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सूत्रांनुसार सर्वात जास्त पॉझिटिव्ह खासदार भाजपचे तर वायएसआर काँग्रेसचे दोन-दोन आणि शिवसेना, द्रमुक, आरएलपीचा प्रत्येकी एकेक सदस्य पॉझिटिव्ह निघाले. सदस्यांची कोरोना चाचणी १३ व १४ सप्टेंबर रोजी केली गेली. चाचणीत ५४ कर्मचारीही पॉझिटिव्ह निघाले आहेत. संसदेत एकदम एवढे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अधिवेशनात सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन केले जात आहे.
संसदेच्या ७८५ सदस्यांपैकी जवळपास २०० सदस्यांचे वय ६५ वर्षांच्या वर आहे. त्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. ६५ वर्षांवरील सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना आम्ही सभागृहात उपस्थित राहणार नाही, असे कळवले.

- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि एच. डी. देवगौडा सोमवारी येथे पोहोचले. नाहीत मुलायम सिंह यादव अधिवेशनाला उपस्थित होते.

सर्वाधिक रुग्ण भाजपाचे
तपासणीत पॉझिटिव्ह निघालेल्या सदस्यांत प्रवेश साहिब सिंह वर्मा, अनंत कुमार हेगडे, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप पाटील चिखलीकर, रामशंकर कठेरिया, डॉ. सत्यपाल सिंह आदींचा समावेश आहे. चिखलीकर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह निघाले आहेत.

Web Title: On the first day of the convention, 30 MPs corona positive, BJP's highest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.