अनंतनागमध्ये १०० तासांनंतर गोळीबार थांबला, पण लष्कराची कारवाई संपलेली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 13:36 IST2023-09-17T13:35:23+5:302023-09-17T13:36:00+5:30
अनंतनागमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेला गोळीबार सध्या थांबला आहे.

अनंतनागमध्ये १०० तासांनंतर गोळीबार थांबला, पण लष्कराची कारवाई संपलेली नाही
गेल्या काही दिवसापासून जम्मू-काश्मिरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सैन्यात गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील तीन अधिकारी शहीद झाले, आता सुमारे १०० तासांनंतर गोळीबार थांबला असला तरी लष्कराची कारवाई अद्याप संपलेली नाही. सततच्या पावसामुळे लष्कराच्या शोध मोहिमेवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे दहशतवाद्यांचा शोध घेणे कठीण झाले आहे, आता लष्करांनी गोळीबार थांबलवा आहे. पण सर्च ऑपरेशन अजुनही सुरू आहे. क्वाडकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर सतत नजर ठेवण्यात येत आहे.
पाकिस्तानात हाहा:कार! एका रात्रीत पेट्रोल २६, डिझेल १७ रूपयांनी महागले, नवे दर झोप उडवेल!
सर्व दहशतवादी मारले गेले आहेत, तर दुसरीकडे टेकडीवरील गुहेत लपले आहेत की पळून गेले आहेत याचा शोध घेतला जात आहे. दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी लष्कर उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या भागात लष्कर शोध मोहीम राबवत आहे, हा घनदाट जंगलाचा परिसर आहे. हा संपूर्ण परिसर डोंगरांचा आहे, हा परिसर पीर पंजाल टेकड्यांशी जोडलेला आहे. लष्कराने कारवाईच्या क्षेत्राला वेढा घातला आहे.
मंगळवारी मध्यरात्रीपासून सैन्याची संशोधन मोहीम सुरू आहे. शनिवारी रात्री सुमारे १०० तासानंतरच गोळीबार थांबला. मंगळवार-बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट्ट हे शहीद झाले. डोंगरावरील गुहेत लष्कराने दोन ते तीन दहशतवादी पकडल्याचा संशय आहे.
उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि चिनार कॉर्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांसारखे वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. या अधिकाऱ्यांनीही चकमकीच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले. नंतर घनदाट जंगल आणि खड्ड्यांचा फायदा घेत दहशतवादी तेथून पसार झाले.