पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार

By Admin | Updated: January 31, 2015 01:45 IST2015-01-31T01:45:38+5:302015-01-31T01:45:38+5:30

पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि गावांवर गुरुवारी रात्रभर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला

Firing on Pakistan border | पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार

पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि गावांवर गुरुवारी रात्रभर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. त्यांना सीमा सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अरनिया आणि आर.एस.पुरा उपसेक्टरमधील नागरी वसाहती आणि चौक्यांना लक्ष्य बनविण्यात आले.
सीमेवर तैनात बीएसएफ जवानांनी लगेच प्रत्युत्तरात गोळीबार सुरू केला. पहाटे २.३० वाजेपर्यत ही चकमक सुरू होती. या भागातून लोकांनी स्थलांतरण केले नसून स्थितीवर आमची बारीक नजर आहे. गरज पडल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल. जोरा फार्म,जगनूचक, खोडा, पिंडी, पित्तळ, चिनाज, विक्रमन, साई, निकोवाल आणि जबोवाल गावावर झालेल्या या तुफान गोळीबारात तीन जण जखमी झाले.

Web Title: Firing on Pakistan border