मोदींच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या बसवर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 13:18 IST2018-07-07T13:16:51+5:302018-07-07T13:18:08+5:30
गोळीबारात एकाच मृत्यू

मोदींच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या बसवर गोळीबार
जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयपूर येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या एका बसवर गंगवार येथे गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाच मृत्यू झाला आहे. राजस्थान सरकारने जनतेसाठी लागू केलेल्या सरकारी योजनांचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या योजनांचे लाभार्थी या बसने जैसलमेर येथून जयपूरला निघाली होती. या हल्ल्यानंतर कार्यक्रमास्थळाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
राजस्थानमधील वसुंधरा राजे यांच्या सरकारने जनतेसाठी १२ नव्या योजनांची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जयपूर येथील अम्रुदों का बाग या स्टेडियममध्ये आयोजित केला आहे. या योजनांचा लाभ मिळणार असलेल्या अडीच लाख जनतेला कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी राज्यसरकारने विविध भागातून सहा हजार बसेसची व्यवस्था केली आहे. यापैकी एक बस जैसलमेर येथून आज सकाळी निघाली असता गंगवार येथे त्या बसला पाच ते सहा बंदुकधारी लोकांनी अडवले व नंतर बसवर गोळीबार केला. या गोळीबारात एकाच मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.