आसाराम प्रकरणातील आणखी एका साक्षीदारावर गोळीबार

By Admin | Updated: July 11, 2015 23:59 IST2015-07-11T23:59:24+5:302015-07-11T23:59:24+5:30

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आणखी एका साक्षीदाराला शुक्रवारी रात्री गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला.

Firing on another witness in Asaram's case | आसाराम प्रकरणातील आणखी एका साक्षीदारावर गोळीबार

आसाराम प्रकरणातील आणखी एका साक्षीदारावर गोळीबार

बरेली (उ.प्र.) : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आणखी एका साक्षीदाराला शुक्रवारी रात्री गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. कृपालसिंग नामक या साक्षीदाराची प्रकृती गंभीर आहे. या खटल्यातील नऊ साक्षीदारांवर आतापर्यंत हल्ला झाला असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.
अज्ञात हल्लेखोरांनी पळून जाण्यापूर्वी त्यांना आसारामबापू विरोधात साक्ष न देण्याची धमकीही दिली. पोलिसांनी शनिवारी येथे दिलेल्या माहितीनुसार शाहजहापूर येथील गदियाना चुंगी परिसरात राहणारे ३५ वर्षीय कृपालसिंग शुक्रवारी रात्री ८.१५ वाजेदरम्यान मोटरसायकलवरून घरी परत जात होते. दरम्यान, रस्त्यात इमली मार्गावर मोटारसायकलस्वार दोन अज्ञात युवकांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
सिंग हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कर्मचारी होते. या कंपनीच्या मालकाच्या मुलीने आसारामबापूने २०१३ साली राजस्थानाच्या जोधपूर येथील त्यांच्या आश्रमात आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेले कृपालसिंग यांचे तीन महिन्यांपूर्वीच बयाण नोंदविण्यात आले होते. गोळीबारात गंभीर जखमी झालेले सिंग यांची प्रकृती नाजूक असून त्यांचे हातपाय निकामी झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, बरेली येथील खासगी रुग्णालयात रात्री उशिरा अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष दिलेल्या बयाणात आसारामबापूचे गुंडे शहाजहापूर येथील संजय, अझरुन आणि राघव हे आपल्याला धमकी देत होते आणि या गोळीबारात त्यांचाच हात असू शकतो, असा आरोप कृपालसिंग यांनी केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Firing on another witness in Asaram's case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.