दिल्लीला प्रदूषणाचा विळखा! बंदी असूनही फोडले फटाके; हवेची गुणवत्ता खालावली, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 11:05 AM2020-11-15T11:05:58+5:302020-11-15T11:07:53+5:30

Delhi Pollution : दिल्लीतील काही परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

fireworks burst fiercely in delhi on diwali pollution extremely dangerous | दिल्लीला प्रदूषणाचा विळखा! बंदी असूनही फोडले फटाके; हवेची गुणवत्ता खालावली, परिस्थिती गंभीर

दिल्लीला प्रदूषणाचा विळखा! बंदी असूनही फोडले फटाके; हवेची गुणवत्ता खालावली, परिस्थिती गंभीर

Next

नवी दिल्ली - फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि कोरोनाच्या संकटात रुग्णांना असलेला धोका लक्षात घेता देशातील अनेक राज्यांत फटाक्यांवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतही वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र प्रशासन आणि सरकारच्या नियमांचा लोकांना विसर पडलेला तिथे पाहायला मिळाला आहे. दिल्लीतील काही परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

वाढते प्रदूषण आणि कोरोनाच्या रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या यामुळे दिल्लीत चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. फटाक्यांमुळे दिल्लीची हवा जास्तच प्रदुषित झाली आहे. तसेच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने दिलेल्या माहितीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक शनिवारी रात्री 400 वरुन थेट 481 वर पोहचत आहे. तर काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक हा जवळपास 1000 पर्यत पोहोचल्याची माहिती मिळत आहे. 

हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी दिल्ली आणि आसपासचे प्रदूषण हे अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचले आहे. फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आलेली असूनही लोक फटाके उडवत होते. हवा गुणवत्ता निर्देशांक हा 400 च्या व गेल्यास श्वसानासंबंधी आजार असणाऱ्या लोकांसाठी ते अत्यंत घातक आहे. कोरोना काळत तर हे धोकादायक आहे. त्यामुळेच प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे.

फक्त दिल्लीच नाही तर एनसीआरमध्येही अशीच परिस्थिती आहे. इंडिया गेट, नेहरू प्लेस, साऊथ एक्स, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले आहेत. यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि ते फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियमांचं पालन न केल्यास तब्बल एक लाखांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र तरीदेखील दिल्लीकरांनी नियम धाब्यावर बसवून फटाके फोडले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: fireworks burst fiercely in delhi on diwali pollution extremely dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.