अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात
By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST
औरंगाबाद : महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीने १४ एप्रिलपासून शहरात अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात झाली.
अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात
औरंगाबाद : महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीने १४ एप्रिलपासून शहरात अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात झाली. पदमपुरा येथील अग्निशमन विभागात सकाळी मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सप्ताहास प्रारंभ झाला. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीच्या स्फोटात ६६ हुतात्मा झालेल्या अग्निशमन अधिकारी, कर्मचारी यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली अर्पण करून दरवर्षी १४ ते २० एप्रिलदरम्यान सप्ताहात जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जातात. सप्ताह काळात अग्निशमन सेवांचे संयुक्त संचलन, व्याख्याने, प्रात्यक्षिके, निधी संकलन करणे आदींचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी एस. बी. झनझन यांनी दिली. ध्वजारोहणप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, नगर सचिव एम. ए. पठाण, आपत्ती व्यवस्थापक अधिकारी हरिहर पत्की आदींची उपस्थिती होती.