कोलकात्यातील सर्वात उंच इमारतीला आग, अनेकजण अडकल्याची भीती

By Admin | Updated: September 2, 2014 11:12 IST2014-09-02T11:12:05+5:302014-09-02T11:12:52+5:30

कोलकाता शहरातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'चॅटर्जी इंटरनॅशनल बिल्डींगला मंगळवारी सकाळी आग लागली असून अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

Fire in Kolkata's tallest building, many fear of being stuck | कोलकात्यातील सर्वात उंच इमारतीला आग, अनेकजण अडकल्याची भीती

कोलकात्यातील सर्वात उंच इमारतीला आग, अनेकजण अडकल्याची भीती

>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २ -  कोलकाता शहरातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'चॅटर्जी इंटरनॅशनल बिल्डींगला मंगळवारी सकाळी आग लागली असून अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.  जवाहरलाल नेहरू रोडवरील या २४ मजली इमारतीच्या १२ ते १५ मजल्यांदरम्यान आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  इमारतीत इडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे बचावकार्यही सुरू आहे.
आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

Web Title: Fire in Kolkata's tallest building, many fear of being stuck