फटाक्याच्या दुकानाला आग लागून आठ जण ठार

By Admin | Updated: October 29, 2016 14:22 IST2016-10-29T14:22:59+5:302016-10-29T14:22:59+5:30

रुस्तमपुरा येथील फटाक्यांच्या दुकानाला आग लागून आठ जण ठार झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे

Fire broke out in the fireworks shop, killing eight people | फटाक्याच्या दुकानाला आग लागून आठ जण ठार

फटाक्याच्या दुकानाला आग लागून आठ जण ठार

ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. 29 - रुस्तमपुरा येथील फटाक्यांच्या दुकानाला आग लागून आठ जण ठार झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. बडोदा जिल्ह्यातील वाघोडिया भागामधल्या रुस्तमपुरा व्हिलेजमध्ये ही दुर्घटना घडली आहे.
आग इतकी भयंकर होती की आठ जण होरपळून ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. काही जखमींची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी संध्याकाळी उशीरा ही आग फटाक्याच्या दुकानाला लागल्यानंतर आजुबाजुच्या दुकानांमध्येही आग पसरली ज्यामुळे तिची भीषणता वाढल्याचे पोलीस अधिकारी सौरभ टोलंबिया यांनी सांगितले.

Web Title: Fire broke out in the fireworks shop, killing eight people