शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 08:40 IST

वाराणसीच्या चौक परिसरात असलेल्या आत्म विश्वेश्वर मंदिरात आरतीदरम्यान आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या चौक परिसरात असलेल्या आत्म विश्वेश्वर मंदिरात आरतीदरम्यान आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. आरतीच्या ताटात लागलेल्या आगीने क्षणार्धात मोठा पेट घेत मंदिरात केलेली कापसाची सजावट उद्ध्वस्त केली. शृंगारात वापरलेल्या वेगवेगळ्या गोष्टींनी या आगीची तीव्रता आणखीनच वाढवली. या दुर्घटनेत पूजेच्या वेळी मंदिरात उपस्थित असलेले पूजारी आणि ९ भाविक आगीत होरपळले आहेत. या पैकी ४ जणांची प्रकृती अधिक गंभीर असून, त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नेमकी कशी घडली घटना?

शनिवारी संध्याकाळी, वाराणसीच्या चौक पोलीस स्टेशन परिसरातील संकट गली येथे स्थित आत्म विश्वेश्वर मंदिरात आरती सुरू असताना, एक जळता दिवा पडला आणि तिथे असलेल्या कापसाच्या सजावटीने पेट घेतल्याने मंदिराला आग लागली. अपघाताच्या वेळी मंदिरात शेकडो भाविक उपस्थित होते.

मंदिरात आग लागताच मोठा गोंधळ उडाला होता. या अपघातात पुजाऱ्यासह नऊ भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच डीएमसह अनेक उच्च अधिकारी रुग्णालयात पोहोचले. आगीच्या घटनेतील जखमींची ओळख पटली असून, या जखमींमध्ये प्रिन्स पांडे, बैकुंठनाथ मिश्रा, सानिध्या मिश्रा, सत्यम पांडे, शिवानी मिश्रा, देव नारायण पांडे आणि कृष्णा यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रथम विभागीय रुग्णालयात आणि नंतर महमूरगंज येथील जेएस मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रावणाच्यानिमित्ताने करण्यात आली कापसाची खास सजावटश्रावण महिन्याच्या निमित्ताने आत्म विश्वेश्वर मंदिरात कापसाने विशेष सजावट करण्यात आली होती. यावेळी शेकडो लोक आरतीसाठी मंदिरात पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरती दरम्यान जळणारा दिवा पडला, ज्यामुळे कापसाच्या सजावटीने सजवलेल्या मंदिराला आग लागली. आग लागताच मंदिरात चेंगराचेंगरी देखील झाली.

टॅग्स :VaranasiवाराणसीfireआगTempleमंदिर