शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये भीषण आग, डब्यात धुराचे लोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 13:00 IST

नुआपाडा जिल्ह्यातील दुर्ग पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला अचानक आग लागली.

नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे दुर्घटनेला आठवडाही उलटलेला नाही. अशातच ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यात मोठा रेल्वे अपघात टळला आहे. नुआपाडा जिल्ह्यातील दुर्ग पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला अचानक आग लागली. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

या घटनेबद्दल माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. तसेच सततच्या घर्षणामुळे ट्रेनच्या ब्रेक पॅडला आग लागली. आग ब्रेक पॅडपर्यंत मर्यादित होती. त्यामुळे या अपघातात कोणतीही हानी झाली नाही.

ब्रेक पॅडला आग - रेल्वे रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले की, गुरुवारी संध्याकाळी ट्रेन खैरयार रोड स्थानकावर पोहोचली तेव्हा बी ३ कोचमध्ये धूर दिसून आला. तासाभरात ही आग विझवण्यात यश आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आणि रात्री ११ वाजता ट्रेन रवाना झाली.

खरं तर दुर्गपुरी एक्स्प्रेसच्या बी ३ कोचमध्ये धुराचे लोट पसरताच लोक ट्रेनमधून बाहेर पडले. त्यामुळे इतर प्रवाशांमध्येही खळबळ उडाली होती. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील मोठ्या अपघातानंतर आठवडाभरात ही घटना घडली. ओडिशा रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला असून १२०० लोक जखमी झाले आहेत. 

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेfireआग