शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Fire In Amritsar : अमृतसरमध्ये गुरु नानक रुग्णालयाला लागली आग; अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 18:09 IST

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एवढ्या वेगाने पसरली, की कुणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. यावेळी रुग्णांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता.

पंजाब- अमृतसर येथील गुरु नानक रुग्णालयाला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. यानंतर, रुग्णालय आणि परिसरात एकच पळापळ बघायला मिळाली. रुग्णांना रुग्णालयातून बाहेर पडणेही कठीन झाले होते. रुग्णालया मागे असलेल्या ट्रांसफॉर्मरमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एवढ्या वेगाने पसरली, की कुणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. यावेळी रुग्णांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता. आगीची माहिती मिळताच, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझविण्याचे काम सुरू आहे.

आग लगताच रुग्णालयात पळापळ - या रुग्णालयामागे असलेल्या ट्रासफॉर्मरने अचानक पेट घेतल्याने आगीने विक्राळ रूप धारण केले होते. आधी एका ट्रांसफॉर्मरला आग लागली, नंतर दुसऱ्याला आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण रुग्णालयातच धूर पसरला. यामुळे रुग्णांचीही धावपळ उडाली. ते आपल्या नातलगांना घेऊन रुग्णालया बाहेर पडले.

रुग्णांना श्वास घेणेही कठीण झाले होते -या रुग्णालयाच्या वेगवेगळ्या वॉर्डमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण होते. ते रुग्णालयाबाहेर धावले आणि रस्त्यावर झोपले. रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे त्यांना श्वास घेणे कठीण झाले होते. मात्र, कुणीही त्यांची मदत केली नाही. ते स्वतःच बाहेर पडले आणि आपला जीव वाचवला.

मंत्री हरभजन सिंग म्हणाले, प्रकरणाची चौकशी सुरू -घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. यानंतर, जवळपास 12 गाड्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रक्षण मिळवले. पण तोवर इमारत पूर्णपणे जळाली होती. यासंदर्भात बोलताना, कॅबिनेट मंत्री हरभजन सिंह यांनी, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Punjabपंजाबhospitalहॉस्पिटलfireआगFire Brigadeअग्निशमन दल