भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीस्थित निवास्थानी भीषण आग लागली आहे. आज सकाळच्या सुमारास प्रसाद यांच्या निवासस्थानी आगीची ही घटना घडली. रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीमधील मदर टेरेसा क्रिसेंट मार्गावर असलेल्या या निवासस्थानी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम हाती घेतले. सुदैवाने या आगीमध्ये फारशी हानी झालेली नाही.
या आगीच्या घटनेबाबत अधिक माहिती देताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानी आग लागल्याची माहिती आम्हाला सकाळी ८ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास कळली. ही आग घरातील एका खोलीमध्ये ठेवण्यात आलेल्या खोलीला लागली होती.
ही आग सकाली सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये लागली. ही आग शमवण्यासाठी तीन फायर टेंडर घटनास्थळी पाठवण्यात आले. तसेच सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवून ती शमवण्यात आली. या आगीच्या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेला नाही. तसेच आग का लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Web Summary : A fire broke out at former minister Ravi Shankar Prasad's Delhi residence early this morning. Fire tenders responded quickly, extinguishing the blaze in a bedroom. No injuries were reported, and the cause is under investigation.
Web Summary : पूर्व मंत्री रविशंकर प्रसाद के दिल्ली स्थित आवास पर आज सुबह आग लग गई। दमकल कर्मियों ने तेजी से कार्रवाई करते हुए बेडरूम में लगी आग को बुझा दिया। किसी के घायल होने की खबर नहीं है, और आग लगने के कारणों की जांच की जा रही है।