शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

Kolkata Railway Building Fire: कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; रेल्वे कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 10:17 IST

Kolkata Railway Building Fire: या आगीत दोन रेल्वे कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला. या इमारतीमध्ये पूर्व रेल्वेचे (Eastern Railway) विभागीय कार्यालय आहे.

ठळक मुद्देआगीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोलकाता: कोलकाता येथील स्ट्रँड रोड (Strand Road) परिसरात असलेल्या एका बहुमजली इमारतीच्या 13 व्या मजल्यावर सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीत दोन रेल्वे कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला. या इमारतीमध्ये पूर्व रेल्वेचे (Eastern Railway) विभागीय कार्यालय आहे. मृतांमध्ये रेल्वे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.(Fire breaks out on the 13th floor of a multi- storey building at Strand road in Kolkata)

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आगीची घटना सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. पूर्व रेल्वेचे प्रवक्ता कमल देव यांनी सांगितले की, न्यू कोयलाघाट इमारतीत (New Koilaghat building) आग लागली. यामध्ये पूर्व रेल्वेचे आणि दक्षिण-पूर्व रेल्वेचे क्षेत्रिय कार्यालय आहे. तसेच, इमारतीच्या तळमजल्यावर कॅम्प्युटराइज्ड तिकीट बुकिंग केंद्र आहे. आग लागल्यामुळे तिकीट बुकिंग प्रकियेवर परिणाम झाला आहे.

आग लागल्याचे समजल्यानंतर सुरक्षा कर्मचारी तातडीने 13व्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी बहुतांश कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. साधारण साडेसहाच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान इमारतीमध्ये आले. ही आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी रेल्वे अधिकारी पार्था सारथी मंडल आणि एस सहनी या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आगीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, स्ट्रँड रोडवरील न्यू कोयलाघाट इमारतीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये चार अग्निशमन कर्मचारी, हरे स्ट्रीट पोलीस ठाण्यात तैनात असलेले सहायक उपनिरीक्षक आणि आरपीएफचा एक जवान असल्याचे अग्निशमन व आपत्कालीन सेवामंत्री सुजित बसू यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेशआगीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत रेल्वे व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. आम्ही या सगळ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालfireआगrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयलMamata Banerjeeममता बॅनर्जी