बिहारमध्ये बसला आग, 8 जणांचा मृत्यू

By Admin | Updated: May 25, 2017 20:56 IST2017-05-25T20:44:10+5:302017-05-25T20:56:10+5:30

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हरनौतमध्ये एका बसला अचानक आग लागल्याने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर बारा जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली.

Fire in Bihar, fire of 8 people | बिहारमध्ये बसला आग, 8 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये बसला आग, 8 जणांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
बिहारशरीफ, दि. 25 - बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हरनौतमध्ये एका बसला अचानक आग लागल्याने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर बारा जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. 
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पटनामधून निघालेली बसने नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफहून शेखपुरा जिल्हात जात असताना हरनौत येथे अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, 12 जण जखमी झाले असून त्यांना नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. 
दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याबाबत अद्याप कोणतेही कारण समजू शकले नाही. 
 

Web Title: Fire in Bihar, fire of 8 people